ग्लोबल

पाकिस्तानातील सियालकोट लष्करी तळावर भीषण स्फोट

स्फोटात किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : उत्तर पाकिस्तानातील सियालकोटमधील (Pakistan Sialkot Military Base) लष्करी तळावर साखळी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट परिसराजवळ या स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, स्फोट झालेले ठिकाण दारुगोळ्याचे साठवण क्षेत्र असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून स्फोटात किती नुकसान झाले आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्या पद्धतीने हे बॉम्बस्फोट झाले आहेत त्यावरून येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सियालकोट येथील घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) सध्या त्यांचे सरकार वाचवण्यासाठी धडपडत करत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने केला होता. खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला जबाबदार असल्याचाही आरोप केला जात आहे. घटनेनंतर अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या ठिकाणी अनेक साखळी स्फोट झाल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT