स्टीव्ह ईस्टरब्रुक 
ग्लोबल

महिला कर्मचाऱ्यासोबत संबंध ठेवणे भोवले 

सकाळ वृत्तसेवा

शिकागो : कंपनीतील महिला सहकाऱ्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी मॅक्‍डोनाल्ड्‌सने मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह ईस्टरब्रुक यांना राजीनामा द्यावा लागला आहे. स्टीव्ह 2015 पासून मॅकडोनाल्ड्‌सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या मेन्यू आणि रेस्टॉरंट्‌स मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे श्रेय स्टीव्ह यांना जाते. त्यांच्या काळात मॅकडोनाल्ड्‌सचा शेअर दुपटीने वाढला आहे. 

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी सहमतीने देखील संबंध ठेऊ नयेत, असा कंपनीचा नियम आहे. मात्र स्टीव्ह गेल्या काही दिवसांपासून आपल्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवून होते होते. त्यांनी एका ई-मेलच्या माध्यमातून कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत असलेल्या संबंधाची माहिती दिली. कंपनीच्या धोरणांचा विचार करता, मी कंपनीच्या मंडळाशी सहमत आहे. ""आता इथून बाहेर पडण्याची वेळ आली आहे"", असे म्हणत त्यांनी आपला राजीनामा दिला.

स्टीव्ह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॅक्‍डोनाल्ड्‌समधून 1993 साली व्यवस्थापक म्हणून केली होती. त्यानंतर, पिझ्झा एक्‍सप्रेस आणि वागामामा या आशियाई फूड कंपनीमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2013 मध्ये पुन्हा मॅक्‍डोनाल्ड्‌समध्ये परतल्यानंतर 2015 साली त्यांची मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली होती. "ईस्टरब्रुक" यांच्यानंतर क्रिस केंपिजिन्स्की यांना मॅकडोनाल्ड्‌स यूएसएचे सीईओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

web title : McDonalds Chief Executive Officer Resigned

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT