ग्लोबल

महिला डॉक्टरचा 'कार'नामा; कोरोनाच्या भीतीमुळे वर्षभर राहिल्या कुटुंबापासून दूर

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. आतापर्यंत असंख्य जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर, अद्यापही काही जणांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर आणि इतरेतर कर्मचारी सातत्याने त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. यातच असेही काही कोव्हिड योद्धे आहेत ज्यांना कर्तव्यापुढे कुटुंबाचादेखील विसर पडला आहे. अमेरिकेतील अशाच एक महिला डॉक्टर आहेत, ज्या वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबियांपासून लांब राहत होत्या.

अमेरिकेतील Dr. Tiffany Osborn या गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबियांपासून दूर राहत आहेत.  विशेष म्हणजे केवळ घरापासून दूरच नाही. तर, त्या चक्क एका कारमध्ये राहत असल्याचं समोर आलं आहे.

Tiffany Osborn या डॉक्टर असून गेल्या वर्षभरापासून Barnes-Jewish Hospital या रुग्णालयात त्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यामुळे आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्या घरात न राहता एका कारमध्येच राहत होत्या. मात्र, आता करोनाचं वॅक्सीन घेतल्यानंतर त्यांनी वर्षभरानंतर घरात पाऊल ठेवलं आहे. 

St. Louis येथे राहणाऱ्या डॉ. टिफिनी या गेल्या एक वर्षापासून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यामुळे हा संसर्ग आपल्या घरात प्रवेश करु नये यासाठी त्या रुग्णालयात किंवा घराबाहेर कारमध्येच राहत होत्या. या काळात त्यांनी त्यांच्या पतीची किंवा मुलांची एकदाही भेट घेतली नाही. २०२० मध्ये त्यांनी घराबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्षभर एकदाही त्या कुटुंबियांनी भेटल्या नाहीत. अखेर वर्षभरानंतर कोव्हिड वॅक्सीन घेतल्यानंतर त्या घरी परतल्या आहेत.

दरम्यान, टिफिनी या आयसीयू वार्डमध्ये काम करतात. परंतु. अनेकदा त्यांना जनरल वॉर्डमध्ये जाऊन लोकांच्या वैद्यकीय चाचण्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे त्या घरी येत नव्हत्या. मात्र, या काळात त्यांच्या मुलांनी आणि पतीने घराची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली हेदेखील डॉ. टिफिनी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

Mumbai Railway : T20 वर्ल्ड कप बघायला आलेल्या विदेशी पर्यटकांच्या रील्समधून मुंबईतील रेल्वेंची 'थू-थू'; कचरा, अतिक्रमणाचे व्हिडिओ व्हायरल; हे स्टेशन की कचराकुंडी?

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Ration card verification : सर्वेक्षणातून होणार रेशन ग्राहकांची खातरजमा; घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती, केंद्र सरकारकडून खासगी कंपनी नियुक्ती

SCROLL FOR NEXT