Russia-Ukraine Conflict  Sakal
ग्लोबल

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सव्वा दोन वर्षे झाली असली तरी दोघांपैकी कोणीही माघार घेत नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

सकाळ वृत्तसेवा

ऑबुर्जन (स्वित्झर्लंड) : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी कोणते प्रयत्न करायचे, यावर चर्चा करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये आज प्रमुख जागतिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये युक्रेनचा सहभाग असला तरी रशियाची उपस्थिती नसल्याने कोणताही तोडगा निघण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सव्वा दोन वर्षे झाली असली तरी दोघांपैकी कोणीही माघार घेत नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. रशियाने आपले सैन्य संपूर्णपणे माघारी घ्यावे आणि ताब्यात घेतलेला प्रदेश सोडून द्यावा, अशी युक्रेनची मागणी आहे. तर, ताब्यात आलेला प्रदेश सोडणार नाही अशी रशियाची भूमिका आहे. जागतिक पातळीवरून योग्य दबाव आणल्यास रशिया माघार घेऊन शांतता निर्माण होऊ शकते, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी मांडली आहे.

शंभर देशांचे प्रतिनिधी हजर

या बैठकीला सुमारे शंभर देशांचे प्रतिनिधी उपस्थित असून किमान निम्मे जण आपापल्या देशांचे प्रमुख आहेत. मात्र, रशियाच्या उपस्थितीला युक्रेनचाच आक्षेप असल्याने त्यांचा कोणीही प्रतिनिधी नाही. त्यामुळे येथील चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT