member of ruling party of maldives zahid rameez remark against indians Boycott Maldives Trending  
ग्लोबल

मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाला बॉयकॉट मालदीव ट्रेंड; काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. यादरम्यान एका मालदीवच्या नेत्याने केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले मोदींचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर या फोटोंची आणि लक्षद्वीपची सर्वत्र चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. पर्यटन स्थळांच्या बाबतीत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याची चर्चा देखील सुरू झाली. मात्र लक्षद्वीपला अधिक पर्यटक आल्यास त्याचा थेट परिणाम मालदीववर होण्याची शक्यता आहे. यादरम्यान एका मालदीवच्या नेत्याने केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्याने मालदीवमधील काही नेत्यांना झटका लागल्याचे पाहायला मिळाले. मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नेते जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवणारी पोस्ट सोशल मीडियाव प्लॅटफॉर्म एक्सवर केली. याचा परिणाम म्हणून सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.

नेमकं झालं काय?

पीएम मोदींनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते. एक्स युजर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, "किती उत्तम पाऊल आहे! मालदीवमधील नव्या चीनचं पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल."

सिन्हा यांच्या पोस्टला उत्तर देताना जाहिद रमीझ यांनी लिहिले, "हे पाऊल खूप चांगले आहे. मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना दिशाभूल करणारी आहे. ते (भारतीय) आम्ही देत ​​असलेली सेवा कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये येणारा वास हे सर्वात मोठं पतन असेल."

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक एक्स यूजर्सनी जाहिद रमीज यांच्यावर वर्णद्वेषी वक्तव्य केल्याचा आरोप केला. तसेच अनेक युजर्सनी संताप देखील व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर Boycott Maldives देखील ट्रेंड करत आहे. लोक मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहीत आहेत.

मालदीवमध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नुकतीच सत्तेवर आली आहे. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव करून डॉ.मोहम्मद मुइज्जू अध्यक्ष बनले आहेत. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला होता. याउलट मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मालदीवचे भारताशी संबंध बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. मुइज्जूने भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT