Mexico Horrible Crime eSakal
ग्लोबल

Horrible Crime : बायकोची हत्या करून खाल्ला मेंदू, कवटीचा बनवला अ‍ॅशट्रे! किळसवाणा प्रकार समोर

सैतानाने आपल्याला हे करण्याची सूचना दिली, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

Sudesh

मेक्सिकोमधून एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ३२ वर्षांच्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून, चक्क तिचा मेंदू खाल्ला. नशेमध्ये असताना त्याने हा प्रकार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अल्वारो असं या व्यक्तीचं नाव आहे. २९ जून रोजी नशेत असताना त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. सँता म्युएर्ते (मृत्यू देवता) आणि सैतानाने आपल्याला हे करण्याची सूचना दिली, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. हत्या केल्यानंतर या व्यक्तीने आपल्या बायकोचे तुकडे करुन प्लास्टिक बॅगमध्ये ठेवले होते.

एका वर्षापूर्वी झालं लग्न

अवघ्या एका वर्षापूर्वीच अल्वारो आणि मारिया मॉन्टसेराट यांचं लग्न झालं होतं. मारियाला आधीपासूनच पाच मुली होत्या. यातील सर्वात लहान १२ वर्षांची, तर सर्वात मोठी मुलगी २३ वर्षांची आहे.

हत्या केल्यानंतर खाल्ला मेंदू

पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या मेंदूचा काही भाग आपण टाकोजमध्ये टाकून खाल्ल्याचं या व्यक्तीने सांगितलं. सोबतच, तिच्या कवटीचा वापर अ‍ॅशट्रे म्हणून केल्याचंही अल्वारोने मान्य केलं. हत्येनंतर दोन दिवसांनी या व्यक्तीने आपल्या एका सावत्र मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली.

"तुम्ही येऊन आपल्या आईला घेऊन जा, मी तिला मारून बॅगेत भरुन ठेवलं आहे" असं अल्वारोने फोनवर सांगितलं होतं. मारियाची आई सेरन यांनी याबाबत माहिती दिली. "त्याने कोयता, छन्नी-हातोड्याने माझ्या मुलीचे तुकडे केले. त्याने नक्कीच ड्रग्स घेतले असणार. त्याशिवाय असं कृत्य करणं शक्यच नाही.." असं त्या म्हणाल्या.

अल्वारो आपल्या सावत्र मुलींना मारहाण देखील करत होता. पोलिसांना तपासावेळी अल्वारोच्या घरात जादूटोणा करण्याचं साहित्य देखील आढळल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बिपिन बाफना खून प्रकरणी आरोपींना ३० वर्षांचा कारावास, हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा रूपांतरित

डायबिटीज पेशंट्ससाठी Good News! आता आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणार इन्सुलिन इंजेक्शन; भारतात आलं नवं इन्सुलिन

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना

Pune Metro Record Ridership : आषाढी वारीत पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एकाच दिवशी तब्बल ३.५२ लाख प्रवाशांनी केला प्रवास

Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

SCROLL FOR NEXT