Mexico Bus Accident eSakal
ग्लोबल

Bus Accident : दरीमध्ये बस कोसळून भीषण अपघात; २७ प्रवासी ठार, मृतांमध्ये १ वर्षाच्या बाळाचा समावेश

मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीजवळ हा भीषण अपघात झाला.

Sudesh

मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. योसोंडुआकडे जाणारी एक बस दरीत कोसळून २७ जण ठार झाले. या दुर्घटनेत २१ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका लहान बाळाचाही समावेश होता, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. गुरुवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान (स्थानिक वेळेनुसार) हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण सुटल्यामुळे ही बस थेट २५ मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे शेजारील गावातील सर्व स्थानिक डॉक्टरांना मदतीसाठी बोलवण्यात आलं होतं.

एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, गंभीर जखमींपैकी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ पुरुष, १३ महिला आणि एका लहान बाळाचा समावेश आहे.

ओआक्साका शहराचे महापौर सालोमॉन जारा यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. तर, ओआक्साचे अंतर्गत सेक्रेटरी जेसस रोमेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अकुशल आणि थकलेला असल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पावसाने पुन्हा दाखवला ‘आपला जोर’! रेल्वे रुळांवर ११ इंच पाणी; प्रवासी अडकले अन् स्टेशनवर मोठी गर्दी

India Squad For Asia Cup 2025: आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील १५ शिलेदार, पूर्ण लिस्ट

China-India: चीनचे परराष्ट्र मंत्री दिल्लीहून इस्लामाबादला जाणार; नेमकं कारण काय?

Video : 'मी सांगितलेला होमवर्क केलास काय रे?' पंतप्रधान मोदींनी अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी साधला संवाद, मिळालं एकदम भारी गिफ्ट..

Viral Video : प्रियकरासोबत जाण्याचा प्लॅन चॅटजीपीटी मुळे धुळीस; महिलेला कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT