Miami Alien Fact Check eSakal
ग्लोबल

Miami Alien : अमेरिकेतील शहरात फिरतोय दहा फुटांचा एलियन? व्हिडिओही समोर... काय आहे सत्य?

एका व्हिडिओमध्ये तर तेथील मॉलबाहेर पोलिसांचा मोठा ताफा दिसतो आहे. त्यामुळे हे पोलीस एलियनला पकडण्यासाठी आले आहेत, असंही म्हटलं जात आहे.

Sudesh

Miami Alien Video : अमेरिकेतील मियामी शहरात सध्या एक दहा फूट मोठा एलियन फिरत असल्याचं म्हटलं जातंय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे कित्येक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तर तेथील मॉलबाहेर पोलिसांचा मोठा ताफा दिसतो आहे. त्यामुळे हे पोलीस एलियनला पकडण्यासाठी आले आहेत, असंही म्हटलं जात आहे.

मात्र, हे सगळं खोटं असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एनबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, मॉलबाहेर पोलिसांची गर्दी ही एलियनमुळे नव्हती. मॉलच्या बाहेर तरुणांच्या दोन गटामध्ये मारामारी झाली होती. त्यांना अटक करण्यासाठी हे पोलीस याठिकाणी दाखल झाले होते. हे सर्व तरुण अल्पवयीन होते असंही स्पष्ट झालं आहे. (Miami Mall Police)

एलियनची चर्चा कशामुळे?

सोशल मीडियावर सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये मियामीच्या रस्त्यांवर एक दहा फूट लांब एलियनसदृष्य गोष्ट (Miami Alien Video) चालताना दिसत आहे. यासोबतच, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका ठिकाणी अचानक काहीतरी चमकदार गोष्ट प्रकट होताना दिसत आहे. अर्थात, या व्हिडिओंची सत्यता अजूनही पुढे आलेली नाही. हे व्हिडिओ आणि त्यातील एलियन देखील फेक असण्याची शक्यता अधिक आहे.

एलियन म्हणजे परग्रहावरील जीव, जे पृथ्वीवर आले आहेत. आतापर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये आणि कॉमिक्समध्ये एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्याचा उल्लेख आहे. परग्रहावर जीवन आहे का याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आला नाही. मात्र एलियन खरे असल्याचा, यूएफओ पाहिल्याचा आणि एलियनला भेटल्याचा दावा करणारे कित्येक लोक वेळोवेळी समोर येत असतात. त्यातूनच अशा अफवांना बळ मिळतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT