लंडन - बोटामधील रक्ताचा नमुना घेऊन प्रतिपींड चाचणी करण्याची नवी पद्धत ब्रिटनने विकसित केली आहे. माणसांवरील गोपनीय चाचण्यांमधील यशानंतर हा उपाय गवसला असून 20 मिनिटांत कोरोना संसर्गाचे निदान होऊ शकेल. विशेष म्हणजे या चाचण्या मोफत केल्या जातील.
ठळक मुद्दे
- ऑक्सफर्ड विद्यापीठातील संयुक्त प्रकल्पाच्या पथकाचे संशोधन
- युके रॅपीट टेस्ट कॉन्सॉर्टीयम असे पथकाचे नाव
- ऑक्सफर्ड विद्यापीठासह ब्रिटनमधील रोगनिदान संस्थांचा सहभाग
- अॅबिंग्डन हेल्थ ही प्रमुख संस्था
- संयुक्त पथकाकडून जूनमध्ये माणसांवरील चाचण्यांमधून प्रयोग
- गेल्या महिन्यातच सुमारे तीनशे माणसांवर चाचण्या
- चाचण्यांचा टप्पा उल्स्टर विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली
- ब्रिटिश सरकारच्या प्रतिपींड चाचणी कार्यक्रमाचे प्रमुख सर जॉन बेल प्रभावित
- बोटातून रक्ताचा नमुना घेण्यासाठी किटच्या प्रतिकृतींची (प्रोटोटाईप) यापूर्वीच निर्मिती
- नियामक संस्थेच्या मंजुरीनंतर येत्या काही आठवड्यांत कारखान्यांमध्ये उत्पादनास प्रारंभ
- या वर्षांची सांगता होण्यापूर्वीAbC-19 लॅटरल फ्लो असे पारिभाषिक नाव असलेली चाचणी सामुहिक निदानासाठी उपलब्ध होण्याची आशा
- संयुक्त पथकातील विविध भागीदार संस्था दर महिन्याला हजारो डोसचे उत्पादन करणार
निदान असे
- विषाणूचा भाग असलेल्या प्रथिनाच्या निमुळत्या पूर्ण भागाचा वापर
- त्याद्वारे रक्त प्रवाह पुढे जात असताना वाय आकाराचे इम्युनोग्लोबीन हेरण्याचा प्रयत्न
- अहवाल पॉझिटीव असल्यास 20 मिनिटांनी कीटवर दोन गुलाबी रेषा उमटणार
महत्त्व काय
याआधी रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जायचे. अहवाल मिळण्यास काही दिवस लागायचे. या चाचणीमुळे व्यक्तीच्या प्रतिकारक्षमतेची पातळी कळू शकेल. कोरोना हा तापासारखा आजार असेल आणि त्यासाठी दर वर्षी लस टोचून घेण्याची गरज पडली तर सामुहिक प्रतिपींड चाचण्या उपयुक्त ठरतील. त्यातून लसीसाठी प्रतिपींड निर्मितीला कसा प्रतिसाद मिळतो हे कळू शकेल.
काही मुद्दे अनुत्तरित
कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन होत असल्याचे दिसून आले आहे. संसर्गाची तीव्रता जास्त असलेल्या प्रत्येक देशात त्याच्या तीव्रतेचे(स्ट्रेन) स्वरूप वेगळे असल्याच्या निष्कर्षाप्रत तज्ञ आले आहेत. अशावेळी भविष्यात रोगाविरुद्ध प्रतिकारशक्तीचा प्रभाव प्रतिपींडामुळे कायम राहणार का, त्यामुळे संसर्ग होणे टळणार का किंवा संबंधित व्यक्तीला पुन्हा संसर्ग होणार नाही का हे मुद्अदे अद्याप अनुत्तरित आहेत.
घरी चाचणीची सुविधा
- ब्रिटिश सरकारच्या योजनेनुसार प्रारंभी आरोग्यसेवा तज्ञांना चाचणी किटचे वाटप
- त्यानंतर लाखो लोकांना वाटप
- घरी चाचणी करून केंद्रीय माहिती संकलन केंद्राला
अहवाल पाठवला जाणार
अशा संशोधनासाठी साधारण एक वर्ष लागू शकते, पण आम्ही दहा आठवड्यांत ते साध्य केले. पूर्ण आठवडा संधोधन-विकास तज्ञ दोन पाळ्यांत सक्रिय होते. आम्ही 98.6 टक्के अचूकता साध्य करू शकलो आणि ही सुवार्ता आहे.
- डॉ. ख्रिस हँड, अॅबिंग्डन हेल्थचे अध्यक्ष
कोरोनाविरुद्ध प्रतिपींडाची जलद चाचणी खरोखरच अनोखी आहे. आपण स्वतः ती घरच्या घरी करू शकतो हे सुद्धा दिसून येते.
- सर जॉन बेल, वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.