nepal, kp sharma oli government, constitution 
ग्लोबल

'भारतासोबतचे गैरसजम दूर झाले'; नेपाळच्या पंतप्रधानांना मैत्रीची आठवण

सूरज यादव

काठमांडू - भारत आणि नेपाळ सीमा वादावर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी अनेकदा भारताविरोधात वक्तव्ये केली आहेत. दरम्यान, आता ओली यांनी नरमाईची भूमिका घेतली असून त्यांनी म्हटलं की, भारतासोबत काही गैरसमज होते ते आता दूर झाले आहेत. ओली यांच्या या वक्तव्याने नेपाळच्या राजकारणात पुन्हा टीका टिप्पणी होऊ शकते. एका मुलाखतीत ओलींनी सांगितलं की, एक वेळ होती की गैरसमज निर्माण झाले होते. मात्र आता ते गैरसमज दूर करण्यात आले आहेत. आपल्याला भूतकाळातील गैरसमज धरून ठेवायला नकोत. तर भविष्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी. आपल्याला सकारात्मक संबंध निर्माण करायचे आहेत.

ओली म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ असे संबंध आहेत आणि दोन्ही देश सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेल आहेत. शेजारी देशांमध्ये प्रेम आणि थोडी कुरबूर होतच असते. चिली आणि अर्जेंटीना यांच्यात वाद नाही का? मी पंतप्रधानांना विनंती करेन, मला वाटतं की सध्याची वेळ आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध पाहता भारताने नेपाळला मदत करावी. याचा अर्थ असा नाही की नेपाळला भारताने मदत केलेली नाही. सध्या नेपाळला कोरोना लशीची गरज आहे. यासाठी नेपाळ शेजारी देशांसह जगभरातील देशांना विनंती करत आहे.

लस जिथून मिळेल तिथून, मग त्यात भारत, चीन, अमेरिका किंवा ब्रिटन यांच्याकडून घ्यायला हवे. लशीवरून राजकारण व्हायला नको, कोरोना लशीसाठी मी माझ्या दोन्ही शेजारी देशांचे आभार मानतो असंही ओली यांनी म्हटलं. पुढे ओली यांनी सांगितलं की, चीनने आम्हाला 1.8 मिलियन लशीचे डोस दिले तर भारताने 2.1 मिलियन डोस पाठवले. आम्हाला दोन्ही देशांनी मदत केली. याशिवाय वैद्यकीय उपकरणेही पाठवली जात आहेत यासाठी दोन्ही देशांचे खूप आभार.

सध्या नेपाळ राजकीय अस्थैर्याचा सामना करत आहे. यातच ओली यांनी एक आश्चर्यचकीत करणारं पाऊल उचललं आहे. त्यांनी मंत्रिमंडळात बदल केला असून, त्यांनी उपपंतप्रधान इश्वर पोखरियाल आणि परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांना हटवले. नेपाळमध्ये सध्या तीन उपपंतप्रधान आहेत. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT