corona vaccine.jpg 
ग्लोबल

आतापर्यंतची सर्वात मोठी चाचणी; 30 हजार जणांना दिली कोरोना लस 

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

वॉशिंग्टन- जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीची मानवी चाचणी सोमवारपासून सुरु झाली आहे. मोडर्ना कंपनीने बनवलेली लस सोमवारी 30 हजार जणांना देण्यात आली आहे. मोडर्ना कंपनी कोरोना विषाणूवरील लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. मोडर्नाने बनवलेली लस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, खात्रीशीर परिणाम मिळण्यासाठी आणखी चाचण्या घेण्यात येत आहेत. 

अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने
स्वयंसेवकांवर कोरोना लसीचा अभ्यास करण्यात आला होता.  यात काही स्वयंसेवकांना खरी लस टोचण्यात आली, तर काहींना डमी लस टोचण्यात आली. यावरुन त्या गटामध्ये कोणते परिणाम दिसून येतात हे पाहिलं जात आहे. हा अभ्यास विशेष करुन कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित असलेल्या क्षेत्रांमध्ये घेण्यात आला. मोडर्नाच्या पहिल्या चाचणीमध्ये 45 स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. या स्वयंसेवकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवाय काही स्वयंसेवकांमध्ये ताप आणि लस टोचलेल्या जागी दुखणे असे साधारण दुष्परिणाम दिसून आले होते.

अमेरिकेने वेगाने कोविड-19 वरील लसीचे परिक्षण सुरु केले आहे. अमेरिका प्रत्येक लसीची चाचणी आपल्या नागरिकांवर घेऊ पाहात आहे. अमेरिका प्रत्येक महिन्याला एका कंपनीची 30 हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेणार आहे. या चाचण्यांमधून लस किती सुरक्षित आहे, हे तपासलं जाणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक या लसींची तुलना करतील. पुढील महिन्यात ऑक्सफर्ड कंपनीच्या लसीवर चाचणी होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जॉनसन अँड जॉनसन कंपनी, ऑक्टोंबरमध्ये नोवावॅक्स कंपनीच्या लसीचा अभ्यास होईल. पीफीझर इंक. स्वत:हून 30 हजार स्वयंसेवकांवर अभ्यास करणार आहे. 

अमेरिकेच्या मोडर्ना  कंपनीची mRNA 1273 लस आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्टिट्यूटची लस AZD1222 याची पहिली मानवी चाचणी पार पडली आहे. या लसींची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. या लसी देण्यात आलेल्या स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी आणि किलर टी-सेल्स मिळाल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे उत्पादन करण्यासाठी भारतातील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने अस्टेराझेनेकासोबत करार केला आहे. दुसरीकडे चीनच्या कँनसिनो कंपनीच्या लसीने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा गाठल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस शोधण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. सध्या जगात 140 पेक्षा अधिक संस्था लस शोधण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. भारतातही भारत बायोटेक कंपनीची मानवी चाचणी सुरु असून लस पहिल्या टप्प्यात आहे. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा वाहतूक कोंडी, शेकडो वाहने अडकली; सलग चौथ्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

WPL 2026 : हा अभिमानाचा क्षण! RCB च्या विजयानंतर विराट कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तोफा थंडावल्या; उद्या होणार मतदान

Ichalkaranji Mayor Election : उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर; उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

India Rafale Deal : भारत १०० पेक्षा जास्त राफेल विमाने खरेदी करणार, तब्बल 'इतका' येणार खर्च

SCROLL FOR NEXT