ग्लोबल

Modi in Rome: ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची PM मोदी घेणार भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सध्या पाच दिवसीय इटली दौऱ्यावर आहेत. 16 व्या G-20 शिखर परिषद आणि COP-26 च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते काल शुक्रवारीच इटलीला रवाना झाले आहेत. या दरम्यान ते रोम, इटली आणि ग्लासगो, यूके येथे जात आहेत. या दोन दिवसीय भेटीदरम्यान आज शनिवारी ते व्हॅटिकनमध्ये (Vatican City) पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेणार आहेत. याबाबतची कल्पना पंतप्रधानांनी गुरवारीच ट्विटरद्वारे दिली होती.

या दरम्यान कोरोना महासाथीसंदर्भात जागतिक परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इटलीमधील मोदींच्या दौऱ्याची माहिती देताना त्यांचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रृंगला यांनी सांगितलंय की, पंतप्रधान मोदी आदरणीय पोप यांची सुरुवातील वैयक्तिक भेट घेतील आणि त्यानंतर काही वेळातच प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा होईल. श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे व्हेटिकनने चर्चा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अजेंडा निश्चित केला नाहीये.

त्यांनी म्हटलंय की, माझ्या समजुतीनुसार अशी परंपरा आहे की जेंव्हा आदरणीय पोप यांच्यासोबत चर्चा होते तेंव्हा कसलाही अजेंडा निश्चित नसतो आणि आम्ही याचा सन्मान करतो. मला असं वाटतंय की या दरम्यान सामान्यत: कोरोना संदर्भात चर्चा होईल. कोरोना महासाथ, आरोग्याचे मुद्दे यासंदर्भात आपण एकत्र येऊन कसे काम करु शकतो, यावर चर्चा होऊ शकते, अशी त्यांनी माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युरोपिय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांच्यासह संयुक्त बैठकीत भाग घेतला. पृथ्वीला सर्वोत्तम बनविण्यासाठी आर्थिक व लोकांमधील परस्पर नाते मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT