narendra modi esakal
ग्लोबल

पृथ्वीला सर्वोत्तम बनविण्यावर मोदींची चर्चा

इटलीत युरोपिय परिषद, आयोगाची बैठक

सकाळ वृत्तसेवा

रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युरोपिय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांच्यासह संयुक्त बैठकीत भाग घेतला. पृथ्वीला सर्वोत्तम बनविण्यासाठी आर्थिक व लोकांमधील परस्पर नाते मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली.

‘जी२०’ शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी मोदी आज इटलीला पोहचले. त्यानंतरची ही त्यांची पहिली अधिकृत बैठक होती. कोरोनाच्या साथीतून जागतिक अर्थव्यवस्था व आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत करणे व शाश्‍वत विकास व हवामान बदल या विषयांवर ते इतर जागतिक नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. चार्ल्स मिशेल व उर्सुला वोन डेर लेयेन यांच्याशी सकारात्मक चर्चेने रोममधील अधिकृत कार्यक्रमांना सुरुवात झाली, असे ट्विट पंतप्रधांनी केले. भारत-युरोपिय संघातील द्विपक्षीय संबंधांना१९६०पासूनच सुरुवात झाली होती. युरोपिय समुदायाबरोबर १९६२ मध्ये राजनैतिक संबंध स्थापन करणाऱ्या देशांपैकी एक भारत होता. भारत व युरोपिय समुदायात पहिली शिखर परिषद २८ जून २००० रोजी लिस्बन येथे झाली होती. दोघांच्या संबंधांतील विकासाच्या दृष्टिने ही ऐतिहासिक घटना होती. हेग येथे २००४मध्ये झालेल्या पाचव्या शिखर परिषदेपर्यंत भारत व युरोपिय समुदायातील संबंध सामरिक भागीदारीपर्यंत पोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT