mohammad shahabuddin chuppu set to be Bangladesh new president check details here  
ग्लोबल

Bangladesh President : बांग्लादेशचे पुढचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू कोण आहेत?

सकाळ डिजिटल टीम

Bangladesh new president : बांग्लादेशमध्ये माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू हेच देशाचे राष्ट्रपती बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. बांग्लादेशच्या संसदेत बहुमत असलेला पक्ष अवामी लीगने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचा कार्यकाळ या वर्षी २४ एप्रील रोजी संपणार आहे.

सध्या बांग्लादेशच्या ३५० सदस्यीय संसदेत अवामी लीगचे ३०५ सदस्य आहेत, त्यामुळे चुप्पू यांचा राष्ट्रपती बनण्याचा मार्ग अगदी सोप्पा समजला जातो आहे. त्यांचे नाव निश्चित समजले जात आहे.

मुख्य विरोधी पक्ष बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या निवडणूकीत राष्ट्रपती पदासाठी नामनिर्देशित करू शकत नाही कारण पक्षातील सर्व सातही खासदारांनी सरकारविरोधी मोहिमेचा भाग म्हणून २०२२ मध्ये राजीनामा दिला होता.

यानंतर अवामी लीगचे महासचिव औबैदुल कादिर यांनी म्हटले होते की, अवामी लीग संसदीय दल (एलपीपी) ने पंतप्रधान शेख हसीना यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर चर्चेअंतर्गत माजी न्यायाधीश मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू यांच्या नाव पुढे आले.

बांगलादेश अवामी लीगने सादर केलेले चुप्पूचा उमेदवारी अर्ज प्राप्त झाला असल्याचे बांगलादेश निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले. आयोग आता संसद सदस्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करेल.

कोण आहेत चुप्पू?

चुप्पू यांचा जन्म पबना जिल्ह्यात झाला. ते 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970 च्या सुरुवातीच्या काळात अवामी लीगच्या विद्यार्थी आणि युवा शाखेचे नेते होते. 1971 च्या मुक्तिसंग्रामातही त्यांनी भाग घेतला होता.

चुप्पू यांच्या कुटुंबात पत्नी रेबेका सुलताना आणि एक मुलगा आहे. सुलताना या बांगलादेशमध्ये सहसचिव होत्या. देशातील सार्वत्रिक निवडणुका या वर्षी डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT