Monkeypox, Corona Latest News Monkeypox, Corona Latest News
ग्लोबल

Three Diseases : एकाचवेळी मंकीपॉक्स, कोरोना, एचआयव्हीची लागण; जगातील पहिले प्रकरण

अहवालानुसार हा व्यक्ती पाच दिवसांच्या सहलीवर स्पेनला गेला होता

सकाळ डिजिटल टीम

Monkeypox, Corona Latest News इटली : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका इटालियन माणसाला एकाच वेळी कोरोना (Corona), मंकीपॉक्स (Monkeypox) आणि एचआयव्ही या तिन्ही आजारांची लागण झाली. घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, ताप आणि जळजळ या तक्रारींनंतर चाचणीत हे उघड झाले. एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी तिन्ही आजारांची लागण झाल्याचे आढळलेले हे जगातील पहिले प्रकरण आहे.

प्रसिद्ध झालेल्या अहवालात या व्यक्तीचे नाव देण्यात आलेले नाही. अहवालानुसार हा व्यक्ती पाच दिवसांच्या सहलीवर स्पेनला गेला होता. तिथून परतल्यानंतर नऊ दिवसांनी हे सर्व लक्षणे त्याच्यामध्ये दिसू लागली. लक्षणांच्या तिसऱ्या दिवशी व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली.

त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर पुरळ आले होते. घाबरलेला व्यक्ती हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात पोहोचला. त्यानंतर त्याला संसर्गजन्य रोग विभागात रेफर करण्यात आले. अहवालानुसार संक्रमित व्यक्तीच्या शरीराच्या इतर भागात जखमा होत्या. चाचणी केली असता मंकीपॉक्स (Monkeypox) आणि एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली.

SARS-CoV-२ जीनोमच्या अनुक्रमानुसार व्यक्तीला ओमिक्रॉनच्या उप-प्रकार BA.५.१ ची लागण झाल्याचे दिसून आले. त्याला फायझरच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. या प्रकरणाची केस स्टडी १९ ऑगस्ट रोजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली. कोरोना (Corona) आणि मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतर व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता एचआयव्ही संसर्गावर उपचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT