Monkeypox esakal
ग्लोबल

Monkeypox : वाढता धोका लक्षात घेता न्यूयॉर्कमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित

मंकीपॉक्सचा आजारामुळे येथे 1.50 लाखांहून अधिक नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका आहे.

सकाळ डिजिटल टीम

Monkeypox Update : मंकीपॉक्स संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांनंतर न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंकीपॉक्स संसर्ग होण्याची प्रकरणे जगातील अनेक देशांसह युरोपमध्येही नोंदवली जात आहेत. याच धर्तीवर संभव्या धोका लक्षात घेत येथे आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स आणि आरोग्य आयुक्त अश्विन वासन यांनी सांगितले की, कोरोनानंतर नव्याने आलेल्या मंकीपॉक्सचा आजारामुळे येथे 1.50 लाखांहून अधिक नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारपर्यंत मंकीपॉक्सची 1,345 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात कॅलिफोर्निया 799 रूग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

23 जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हा आजार अनेक दशकांपासून आहे, परंतु बाहेर तो तितकासा व्यापक नव्हता. मात्र, आता या आजाराने पाय पसरण्यास सुरुवात केली असून, भारतात आतापर्यंत या आजाराचे चार बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

80 देशांमध्ये मंकीपॉक्सची 22,000 हून अधिक प्रकरणे

WHO नुसार, या वर्षी मे पासून 80 देशांमध्ये मंकीपॉक्सची 22,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी सुमारे 75 संशयित मृत्यू आफ्रिकेतील नायजेरिया आणि काँगोमध्ये झाले आहेत. ब्राझील, स्पेनमध्येही मंकीपॉक्समुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT