ग्लोबल

Monkeypox : विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश

सकाळ डिजिटल टीम

Monkeypox In China : कोरोनाने सर्वाधिक फटका बसलेल्या चीनने आता मंकीपॉक्स विषाणूची धास्ती घेतली असून, चीनमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यानंतर चीन प्रशासनाने विदेशी नागरिकांपासून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या त्वचेच्या संपर्कात न येण्याचे आदेश चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वू झुन्योऊ यांनी दिले आहेत.

चीनच्या चोंगकिंग शहरात परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. लागण झालेली व्यक्ती परदेशी आहे की चीनी हे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर विदेशी नागरिकांच्या संपर्कात येऊ नये हे विधान वांशिक आणि भेदभाव करणारे आहे, अशी टीका अनेकांनी सोशल मीडियावरून करत आहेत. करोना साथीच्या काळात परदेशी नागरिकांनी भीतीपोटी ज्याप्रकारे चिनी नागरिकांचा संपर्क टाळला होता, हा तसाच प्रकार असल्याची पोस्ट ‘विईबो’ या संकेतस्थळाने केली आहे.

मंकीपॉक्स 90 देशांमध्ये पोहोचला

मे महिन्यात जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेली प्रकरणे समोर येऊ लागली. त्यानंतर आता हा विषाणू जगभरातील 90 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली असून, जगभरात 60,000 हून अधिक जणांना याची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

भारतात 13 रूग्ण

जगातील विविध देशांमध्ये पसरणाऱ्या मंकीपॉक्सचे रूग्ण भारतातदेखील आढळून आले असून, आतापर्यंत या आजाराचे देशात आतापर्यंत 13 रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या राजधानी दिल्लीत आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामानाचा अंदाज अन् पायलटनं फिरवला निर्णय; राहुल गांधींच्या विमानाला का करावं लागलं 'गो-अराउंड'? लँडिंगच्या १० मिनिटांपूर्वी काय घडलं?

Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

Education Awards: डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीमच्या दोन प्राध्यापकांचा गौरव

युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT