ग्लोबल

जीव वाचवण्यासाठी १० लाख नागरिकांनी युक्रेन सोडलं; संयुक्त राष्ट्राची माहिती

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत युक्रेनमधून जवळपास १० लाख नागरिक सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर पडल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

गेल्या ११ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर रशियावर अनेक देशांकडून निर्बंध लागू केले जात आहेत. यातच रशियाने शनिवारी तात्पुरत्या युद्धबंदीची घोषणा केली. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नाटोने जेव्हा नो फ्लाय झोन घोषित कऱण्यास नकार दिला तेव्हा युक्रेनच्या राष्ट्रपतींनी संताप व्यक्त केला होता. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे ताब्यात घेतली असून त्यात खेरसन आणि मारियुपोलचा समावेश आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत २० हजारांहून अधिक भारतीय नागरिकांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणण्यात आलं आहे. आता ऑपरेशन गंगा शेवटच्या टप्प्यात सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत युक्रेनमधून जवळपास १० लाख नागरिक सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर पडल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

युद्धाचं संकट असताना आपला जीव वाचवण्यासाठी युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांनी इतर देशांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पश्चिम सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये युक्रेनचे नागरिक जात आहेत. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांचा समावेश सर्वाधिक असल्याचं संयुक्त राष्ट्राने सांगितलं आहे.

रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याला युक्रेनकडूनसुद्धा प्रत्युत्तर दिलं जात आहे. यात युक्रेनने असा दावा केला आहे की, त्यांनी रशियाचे ११ हजार सैनिक ठार केले आहेत. तर रशियाचा असा दावा आहे की, युक्रेनची ६८ रडार स्टेशन उद्ध्वस्त करण्यात आली अशून युक्रेनमधील गॅस ट्रान्समिशन नेटवर्कसुद्ध ठप्प झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT