ग्लोबल

केवळ विद्यार्थ्यांसाठी मशिदीच्या अजानबाबत घेतला कौतुकास्पद निर्णय!

सकाळ डिजिटल टीम

जलपाईगुडी : लाऊडस्पीकरवरील अजान अनेकदा वादाचा विषय बनला आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमसह अनेकांनी याविरोधात आवाज उठवला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीच्या इमामाने लाऊडस्पीकरच्या अजानबाबत असा निर्णय घेतला आहे, जो जाणून तुम्हीही इमामाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

येथे लाऊडस्पीकरवरून अजान होणार नाही

जलपाईगुडीतील एका मशिदीचे इमाम नजीमुल हक यांनी निर्णय घेतला आहे की, यापुढे मशिदीत लाऊडस्पीकरवरून अजान दिली जाणार नाही. वास्तविक हा निर्णय मशिदीजवळ शाळा असल्यामुळे आणि लाऊडस्पीकरवर अजान दिल्याने शाळेत शिकणाऱ्या मुलांना त्रास होतो.

काय म्हणाले मशिदीचे इमाम?

इमाम नजीमुल हक म्हणाले की, यापुढे आम्ही लाऊडस्पीकरशिवाय मशिदीत अजान देऊ. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि मुलांना शाळेत शांततेने अभ्यास करता येणार आहे.

शाळेतील शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले

मशीद प्रशासनाने आम्हाला चांगले सहकार्य केल्याचे मशिदीजवळील शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी सांगितले. कोविड-19 चे रुग्ण कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मशिदीमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकर न वापरण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: वाशिममध्ये वीटभट्टी जवळील विहरीत पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT