Omicron file photo
ग्लोबल

आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक व्हेरिंयंट ओमिक्रॉन?; WHO काय सांगतंय

Omicron: सध्या जगावर कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली आहे.

सुधीर काकडे

कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडतो न पडतो तोच आता जगावर ओमिक्रॉनच्या संकटांचं सावट आलं आहे. त्याच पार्श्वभूमिवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. या विषाणूबद्दल मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जातेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने कोरोना विषाणूच्या या प्रचंड वेगाने पसरणाऱ्या या विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ग्रीक भाषेतील ओमिक्रॉन (Omicron) असं नाव देण्यात आलेल्या या विषाणूचा पहिला रुग्ण दक्षिण अफ्रिकेत सापडला आहे. या विषाणुबद्दल वेगवेळ्या गोष्टी समोर आल्या असून, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  1. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणुची बाधा झालेल्या लोकांना पुन्हा एकदा या विषाणुची बाधा होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका जास्त असणार आहे.

  2. ओमिक्रॉन विषाणूचे संक्रमण हे कोरोना विषाणुपेक्षा जास्त वेगाने होते का? या बद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नसून, पुढच्या काळात हे स्पष्ट होईल.

  3. कोरोना विषाणूवर ओमिक्रॉनचा नेमका काय परिणाम होणार याचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ करत आहेत.

  4. सुरुवातीला समोर आलेल्या आकड्यांनुसार दक्षिण अफ्रिकेतील रूग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या वाढली आहे. या विषाणूची भयावहता समजण्यासाठी शास्त्रज्ञांच्या एका चमुचा अभ्यास सूरू असून लवकरच त्याबद्दलची अधिकृत माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

SCROLL FOR NEXT