ग्लोबल

विचित्र घटना! निरोगी मुलीवर केली शस्त्रक्रिया आणि...

ही मुलगी दोन वर्षांची असतांना तिला दत्तक घेण्यात आलं होतं

शर्वरी जोशी

आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या अनाथ मुलांना दत्तक घेण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. मात्र, अनेकदा मुलांना दत्तक घेतल्यावर त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या घटनाही ऐकिवात आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेची चर्चा रंगली आहे. दत्तक घेतलेली मुलगी निरोगी असतांनादेखील एका महिलेने तब्बल ५०० वेळा या मुलीला डॉक्टरांना दाखवलं आहे. तसंच तिच्यावर काही शस्त्रक्रियादेखील (surgery) केल्या आहे. त्यामुळे या महिलेला मेडिकल चाईल्ड अब्युज अंतर्गत दोषी ठरवण्यात आल्याचं 'डेली मेल'च्या वृत्तात म्हटलं आहे. (mother-accused-of-faking-her-6-year-old-daughters-illness-forced-her-to-undergo-surgery)

वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या हार्टमॅन या महिलेने आफ्रिकेतील झांबिया येथून दोन वर्षांच्या एका मुलीला दत्तक घेतलं होतं. मात्र, या मुलीला हेमिप्लेगिया हा दुर्मिळ न्युरोलॉजिकल आजार असल्याचं म्हणत हार्टमॅन यांनी वारंवार या मुलीला डॉक्टरांना दाखवलं. जवळपास ५०० पेक्षा जास्त वेळा या मुलीला डॉक्टरांना दाखवण्यात आलं असून तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. इतकंच नाही तर सहा वर्षांच्या या लहान मुलीला हार्टमॅन यांनी फीडिंग ट्यूब लावून व्हील चेअरवरही ठेवलं आहे.

दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या मुलीला कोणताही आजार नसून ती निरोगी आहे. मात्र, तरीदेखील हार्टमॅन तिला आजारी असल्याचं सांगत तिच्या वेगवेगळ्या टेस्ट करत असतात. विशेष म्हणजे हार्टमॅन यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या मुलीची शस्त्रक्रियादेखील केली आहे. त्यामुळे मेडिकल चाईल्ड अब्युज अंतर्गत या महिलेला दोषी ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT