Muhammad Yunus  sakal
ग्लोबल

Muhammad Yunus : भारताच्या भूमिकेने दुःख झाले : युनूस

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाचा भडका उडाला असून याबाबत भारताच्या भूमिकेबाबत येथील अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन शेजारील देशांमध्ये पसरेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ढाका : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनाचा भडका उडाला असून याबाबत भारताच्या भूमिकेबाबत येथील अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन शेजारील देशांमध्ये पसरेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले, ‘‘हे आंदोलन बांगलादेशची अंतर्गत बाब आहे, असे भारताने म्हटल्याने मला खूप दुःख झाले. समजा भावाच्या घरात आग लागली तर मी कसे म्हणू शकेन की ती त्याचा अंतर्गत बाब आहे. मुत्सद्देगिरीत ‘त्यांची ही अंतर्गत बाब आहे,’ असे म्हणण्यापेक्षा अधिक समृद्ध शब्दसंग्रह आहे.’’ बांगलादेशात १७ कोटी लोक संघर्ष करीत आहेत. युवकांच्या हत्या होत आहेत. कायदा- सुव्यवस्था ढासळत आहे. ही अशांतता केवळ बांगलादेशपुरतीच मर्यादित न राहता, शेजारील देशांमध्येही हे लोण पसरेल हे निश्‍चित, असा इशारा त्यांनी दिला.

‘लोकशाही व्यवस्थेला पाठिंबा द्या’

बांगलादेशमधील लोकशाही व्यवस्थेला भारताने पाठिंबा द्यावा आणि निवडणुकीतील अपारदर्शकतेवर टीका करावी, असे आवाहन युनूस यांनी केले. भारतात नियमित आणि यशस्वीपणे होणाऱ्या निवडणुकांचे त्यांनी कौतुक केले. तसेच बांगलादेशच्या लोकशाही उद्दिष्टांना भारताकडून समर्थम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या मुद्द्यावर भारत सरकारशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badrinath Kedarnath Entry Ban : बद्रीनाथ,केदारनाथ सह 'या' ४८ मंदिरांतही गैर हिंदूना प्रवेश बंदीची तयारी, कशामुळे घेतला निर्णय ?

Bigg Boss Marathi 6 : नवी एंट्री की नवा ट्विस्ट ? वाईल्ड कार्डचा प्रोमो पाहून सोशल मीडियावर भलत्याच चर्चा

Beed News : पोलिसच विनाहेल्मेट! सक्ती केवळ पहिल्या दिवशीच; रस्ता सुरक्षा अभियानाचा अधिकाऱ्यांना पडला विसर

रेल्वेला उशीर, AC किंवा कोचमध्ये बिघाड असल्यास चिंता करू नका! तिकीटाचा एक-एक पैसा मिळणार परत, IRCTC कडून रिफंड घेण्यासाठी करा हे एकच काम

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT