Hafiz Saeed sakal
ग्लोबल

Pakistan Election : मुंबईवर हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा पक्ष लढविणार निवडणूक

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा पक्ष पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुतांश जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

पीटीआय

लाहोर - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा पक्ष पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुतांश जागांवर उमेदवार उभे करणार आहे. सईद याने स्थापन केलेल्या मरकझी इस्लामिक मुस्लिम लीग (पीएमएमएल) या राजकीय पक्षाच्या वतीने नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. पाकिस्तानला इस्लामी कल्याणकारी राष्ट्र बनविण्याचे ध्येय असल्याचा दावा ‘पीएमएमएल’ने केला आहे.

‘पीएमएमएल’चा अध्यक्ष खालिद मसूद सिंधू याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. पाकिस्तानातील विविध प्रांतातील निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्याच्या पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

स्वतः सिंधू हा, पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज गट) प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा तल्‍हा सईद हा देखील लाहोरमधून निवडणूक लढविणार आहे. दरम्यान, ‘पीएमएमएल’ या पक्षाचा आणि हाफीज सईद याचा काहीही संबंध नाही असा दावा सिंधू याने केला आहे.

‘एमएमएल’चेच दुसरे रूप

हाफीज सईद याच्या जमात-उद्‍-दावा या दहशतवादी संघटनेतून निर्माण झालेल्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षावर २०१८मध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर ‘पीएमएमएल’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या आधी २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांत या पक्षाचे बहुतांश उमेदवार पराभूत झाले होते. विशेषतः पंजाब प्रांतात तर या पक्षाचा धुव्वा उडाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT