Murder Murder
ग्लोबल

क्रुरतेचा कळस! मृत्यूपूर्वी तिला खणायला लावली स्वतःची कबर

हत्या करण्यापूर्वी आरोपींनी अमांडाला कबर खोदण्यास सांगितले

सकाळ डिजिटल टीम

काही लोक खूपच क्रूर असतात. कुणाचा खून करणे त्यांच्यासाठी काहीही नसते. काही तडफडू तडफडू मृत्यू देतात. असाच काहीसा प्रकार ब्राझीलमध्ये उघडकीस आला आहे. मुलीचा खून (murder) करण्यापूर्वी तिच्या हातानेच कबर खोदली गेली आणि तिच्यातच तिचा मृतदेह पुरला गेला. अमांडा अल्बाच असे मृत युवतीचे नाव आहे.

‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, अमांडा अल्बाच (वय २१, रा. सांता कॅटरिना, ब्राझील) (brazil) ही काही मित्रांसोबत सांता कॅटरिना येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. येथे तिला काही लोक अमली पदार्थ विकत असल्याचे दिसले. यामुळे तिने लपून त्यांचे काही छायाचित्र काढले. मात्र, ही बाब त्‍यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी अमांडा हिची हत्या करण्याचा कट रचला.

अमांडा मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतीत झाले. त्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क काही होत नव्हता. मुलगी घरी परत न आल्याने हताश झालेल्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस तपास करीत असताना एक संशयित ड्रग्ज विक्रेता पोलिसांच्या हाती लागला. त्याची कसून चौकशी केली असता अमांडा हिच्या हत्येची कबुली दिली.

पोलिसांनी केला खळबळजनक खुलासा

अमांडा अल्बाच मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेल्यानंतर काही अवैध धंदे करणाऱ्यांनी तिच्या हत्येचा कट रचला. हत्या करण्यापूर्वी आरोपींनी अमांडाला कबर खोदण्यास सांगितले. यानंतर त्यांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर तिने खोदलेल्या कबरमध्ये मृतदेह पुरत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. तिचा मृतदेह समुद्रकिनारी पुरलेला पोलिसांना आढळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT