myanmar 
ग्लोबल

कोरोनाची भीती; चीनने म्यानमार सीमेवरील गावात केलं लॉकडाऊन

सकाळ डिजिटल टीम

नेपिटो - म्यानमारमध्ये सध्या लष्कराने सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. लष्कराविरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर गोळीबारही केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. थायलंड सीमेवर असलेल्या गावात लष्कराने हवाई हल्लाही केला. यानंतर नागरिक थायलंडमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे म्यानमारला लागून असलेल्यी चीनच्या सीमेवरील गावात सहा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जवळपास दोन महिन्यांनी रुग्ण सापडल्यानं चीनने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 

रुईली इथं लक्षणं नसलेले तीन रुग्ण सापडले. त्यांचे वय 24 ते 28 वर्षांच्या दरम्यान आहे. रुईली हे म्यूसमधील क्रॉसिंग पाँइंट आहे. याठिकाणी म्यानमारमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सीमेवर सैनिकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कोरोनाच्या भीतीने चीनने म्यानमार सीमेवर असलेल्या गावात लॉकडाऊन केलं आहे. इथं कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश दिले आहेत. रुईलीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची कोरोना चाचणी करण्यात येईल. तसंच प्रत्येकाला आठवडाभर होम क्वारंटाइन व्हावं लागेल असे अधिकृत पत्रकच काढण्यात आलं आहे. रहिवाशांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव बाहेर जाता येणार नाही. अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठीसुद्धा प्रत्येक घरातील फक्त एकच व्यक्ती बाहेर जाऊ शकते. 

म्यानमारमधील लष्कराने केलेल्या गोळीबारानंतर नागरिक इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. यामुळे मणिपूरने अशा स्थालंतर करणाऱ्या नागरिकांना अन्न निवारा देऊ नये असा आदेश काढला होता. चंडेल, तेंगोउपल, कामजोंग, उखरूल आणि चुराचंदपूरच्या उपायुक्तां असे आदेश 26 मार्चला दिले होते. मात्र हा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: गरम अन् ताजं जेवण मिळणार...! मुंबई ट्रेन प्रवास स्वादिष्ट होणार; रेल्वे केटरिंगचा मोठा मेगा प्लॅन तयार, वाचा...

Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

अखेर स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केल्या ‘Last Few’ च्या पोस्ट, नेटकरी म्हणतात-

Solapur News : कामे होत नसल्याचा संताप; मंगळवेढ्यात नागरिकांनी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले!

Nilanga Election: अखेर निलंग्याची निवडणूक स्थगित; न्यायालयीन निकालामुळे नगरपालिकेत मतदान पुढे ढकलले!!

SCROLL FOR NEXT