स्यू की sakal
ग्लोबल

स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास

कोरोना नियमांचा भंग आणि जमावाला चिथावणी देणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

न्यापीताव : म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांना येथील विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. कोरोना नियमांचा भंग आणि जमावाला चिथावणी देणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.

म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या ताब्यातून या वर्षी फेब्रुवारीमध्ये लष्कराने सत्ता हिसकावून घेतली. तेव्हापासून नोबेल पुरस्कार विजेत्या स्यू की (वय ७६) आणि इतर नेते अटकेत आहेत. लष्करी सत्तेने स्यू की यांच्यावर इतरही अनेक आरोप ठेवले असून त्याबाबतही खटले सुरु आहेत.

लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यावर स्यू की यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून जनतेला विरोध करण्याचे आवाहन केले होते. तसेच, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी स्यू की यांनी प्रचार करताना कोरोना नियमांचा भंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. या निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला होता. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करतच लष्कराने सत्ता काबीज केली. मात्र, असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यातही यापैकी एका खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : पाकिस्तानात पुन्हा पुलवामा सारखा आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानमध्ये ५ सुरक्षा जवानांसह ८ जणांचा मृत्यू

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

Nanded News: युवकाला कारने चिरडले, बहिणीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; भाऊबीजेच्या दिवशीच नांदेड-हैदराबाद महामार्गावर अपघात

Latest Marathi News Live Update : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेंगळुरू विमानतळावर पंतप्रधान मोदींचे केले स्वागत

Indian Agriculture: हवामान बदलावर मात करण्याची भारतीय शेतीत ताकद! जमिनीतील कार्बन साठवणुकीतून सुपीकताही वाढणार; नीरीच्या संशोधनातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT