कारेन : लष्करी राजवटीने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कारेन गावातील अनेक नागरिकांनी जंगलात आश्रय घेतला आहे. 
ग्लोबल

हवाई हल्ल्यानंतर म्यानमारच्या लोकांची थायलंडमध्ये धाव

पीटीआय

यांगून - म्यानमारच्या लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या आणि अधिक स्वायत्तता मागणाऱ्या कारेन गावातील बंडखोरांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर या गावातील नागरिक मोठ्या संख्येने शेजारील थायलंडमध्ये पळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे थायलंडने सीमेवरील बंदोबस्त कडक केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कारेन गावातील ‘कारेन नॅशनल लिबरेशन आर्मी’ने शनिवारी (ता. २७) लष्कराच्या एका ठाण्यावर हल्ला करत त्याचा ताबा घेतला होता. त्याला प्रत्युत्तर देताना लष्कराने रविवारी या गावावर हवाई हल्ला केला होता. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर या गावातील जवळपास अडीच हजार जणांनी सीमा ओलांडून थायलंडमध्ये प्रवेश केला आहे. आणखी किमान १० हजार जण स्थलांतराच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारेनमधील बंडखोर गट आणि लष्करी राजवटीविरोधात निदर्शने करणारे आंदोलनकर्ते एकमेकांना सहकार्य करण्याचीही चिन्हे आहेत.

म्यानमारमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांवर दडपशाही सुरुच ठेवली असून शनिवारी एकाच दिवशी किमान ११४ आंदोलकांना गोळी घालून ठार करण्यात आले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

भयानक घटना! कॅनडाच्या खेळाडूचा पाय मोडला, वेदनेने कळवळला, रडला; स्ट्रेचरवरून सोडावे लागले मैदान; Video Viral

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज रात्री १० वाजता कोल्हापुरात येणार

SCROLL FOR NEXT