Mystery Village Viral News esakal
ग्लोबल

Mystery Village Viral News : जगातलं एक रहस्यमयी गाव, इथे फक्त माणसंच नाही तर, पशू-पक्षीही आहेत आंधळे

जगात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्या ऐकून आपण आश्चर्य चकीत होतो.

धनश्री भावसार-बगाडे

Mexico Village A Mysterious Place : जगात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत, ज्या ऐकून आपण आश्चर्य चकीत होतो. त्यातील चित्रविचित्रता कळल्यावर काय बोलावे हेदेखील सुचत नाही. बऱ्याचदा त्यावर विश्वास ठेवणेही कठीण होते. अशाच एका रहस्यमयी गावाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गावातले फक्त माणसंच नाही तर पशू-पक्षीपण आंधळे आहेत. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.

Mystery Village Viral News

याला जगातलं सगळ्यात रहस्यमयी गावदेखील म्हणता येईल. इथे प्रत्येक जीव आंधळा आहे. म्हणूनच याला आंधळ्याचे गाव म्हणूनही ओळखले जाते. याच विचित्र कारणामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. हे जाणून विचित्र वाटत असले तरी इथली कहाणी चकीत करणारी आहे.

मेक्सिकोमधल्या या गावाचं नाव टिल्टेपक आहे. इथे राहणारा प्रत्येक माणूस आणि जनावर पूर्णपणे आंधळा आहे. त्यांना काहीही दिसत नाही. जेव्हा इथे एखादं मुल जन्म घेतं तेव्हा ते सामान्य असतं. त्याचे डोळे व्यवस्थित असतात. पण हळू हळू तो आंधळा होऊ लागतो.

Mystery Village Viral News

इथे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, एका शापित झाडामुळे ते सर्व आंधळे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, इथे लवजुएला नावाचं एक झाड आहे. जे बघितल्याने माणूसच नव्हे तर पशू-पक्षीही आंधळे होतात. गावात हे झाड अनेक वर्षांपासून आहे. लोकांचं म्हणणं आहे ते झाड बघून ते आंधळे होतात.

पण तज्ज्ञांच मत आहे की, हे गाव जिथे आहे तिथे काही विषारी माशा आढळतात. त्या माशा चावल्याने माणूस आंधळा होतो. याविषयी माहित झाल्यावर मेक्सिकन सरकारने त्या ग्रामस्थांची मदत करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारलाही यश मिळाले नाही.

Mystery Village Viral News

सरकारने या लोकांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, पण ती लोकं दुसऱ्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव लोकांना त्यांच्या हालवर सोडावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT