जकार्ता - ईद उल फित्रच्या निमित्ताने प्रार्थना करताना नागरिक.
जकार्ता - ईद उल फित्रच्या निमित्ताने प्रार्थना करताना नागरिक. 
ग्लोबल

बर्लिनच्या चर्चमध्ये नमाजपठण

वृत्तसंस्था

बर्लिन - जर्मनीमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी बर्लिन येथील एका चर्चने नजीकच्या मशिदीतील मुस्लिम नागरिकांसाठी चर्चच्या प्रांगणात  नमाजाचे आयोजन केले होते. 

जर्मनीमधील प्रार्थनागृहे मे महिन्याच्या सुरवातीस पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी प्रार्थना करताना अथवा प्रार्थनागृहांमध्ये नागरिकांनी एकमेकांपासून किमान १.५ मीटर (पाच फूट) अंतर ठेवावे लागेल असा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दार असलम या मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी केवळ ५० जणांनाच प्रार्थनेत सहभागी होता येत असल्याने अनेक मुस्लीम नागरिक नमाजासाठी मशिदीमध्ये जाऊ शकत नव्हते अशावेळी परिसरातील मार्था लुथरन चर्चने या नागरिकांसाठी नमाजाचे आयोजन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हे केवळ एकतेमुळे शक्य झाले
रमजानच्या पवित्र महिन्यात शुक्रवारच्या प्रार्थनेला महत्त्व असते. अशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे काही नागरिकांना नमाजात सहभागी होता येत नव्हते. अशावेळी चर्चने आम्हाला मदत करत आमच्यासाठी नमाजाचे आयोजन केले. हे केवळ एकतेमुळे शक्य झाले असल्याचे विधान दार असलम या मशिदीचे इमाम मोहम्मद ताहा सबरी यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT