PM Narendra Modi PM Narendra Modi
ग्लोबल

काँग्रेसने ‘या’ निर्णयासाठी केले मोदी सरकारचे समर्थन; सूत्रांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) मतदानापासून दूर राहण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे काँग्रेस नेत्यांनी समर्थन केल्याचे गुरुवारी (ता. ३) सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयात झालेल्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियन लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संसदीय समितीला निर्वासन प्रक्रिया आणि सद्यस्थितीची माहिती दिली. काँग्रेस नेत्यांनी यूएनजीएमध्ये मतदानापासून दूर राहण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताने पुन्हा एकदा युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये रशियाच्या विरोधात मतदानात भाग घेण्याचे टाळले आहे.

जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, आनंद शर्मा, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, आरजेडीचे प्रेमचंद्र गुप्ता, भाजपचे जीव्हीएन नरसिंह राव आदींनी भाग घेतला. यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशिवाय मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.

युक्रेनमधील (ukraine) घडामोडींवर परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपली. या समस्येच्या धोरणात्मक आणि मानवतावादी आयामावर चांगली चर्चा झाली. युक्रेनमधून सर्व भारतीयांना परत आणण्याच्या प्रयत्नाच्या बाजूने एक मजबूत आणि एकमत संदेश मिळाला, असे ट्विट बैठकीनंतर जयशंकर यांनी केले. बैठकीत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी युक्रेनमधील परिस्थिती आणि तेथून भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.

युक्रेनच्या (ukraine) मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीची बैठक पार पडली. सर्वसमावेशक माहिती आणि आमच्या प्रश्नांची आणि चिंतांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल मी एस जयशंकर आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो. याच भावनेने परराष्ट्र धोरण पाळले पाहिजे, असेट ट्विट बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केले. सहा राजकीय पक्षांच्या नऊ खासदारांनी बैठकीत सहभाग घेतला होता. काँग्रेसकडून राहुल गांधी, आनंद शर्मा आणि मी त्यात सहभागी झालो होतो. सौहार्दपूर्ण वातावरणात मोकळेपणाने चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

१७,००० भारतीयांनी युक्रेनची सीमा सोडली

भारत सरकार (central government) आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न तीव्र करीत आहे. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. सल्लागार जारी झाल्यापासून एकूण १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनची सीमा सोडली आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. युक्रेन सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही भारतीयांचा समावेश आहे ज्यांनी यापूर्वी किव्हमधील भारतीय दूतावासात नोंदणी केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT