Robot Snake  sakal
ग्लोबल

Robot Snake : शनीच्या चंद्राचे विश्‍लेषण करणार ‘रोबोटिक साप’

‘नासा’कडून स्वयंचलित ‘ईल्स’च्या चाचण्या सुरू; माहिती लवकर मिळण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : शनीच्या ८३ चंद्रांपैकी एक एन्सेलेडसच्या बर्फाळ पृष्ठभागाखालील समुद्राचा शोध घेण्यासाठी अमेरिका अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ सापाच्या आकारातील रोबोच्या चाचण्या घेत आहे. एन्सेलेडसच्या पृष्ठभागावरील छिद्रांवरून हा रोबो आत प्रवेश करणार आहे.

जेट प्रोपोल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) येथे ‘नासा’चे एक पथक या नव्या योजनेवर काम करीत आहे. ‘द एक्झोबायलॉडी एक्सटंट लाइफ सर्वेअर किंवा ‘ईल्स’ (ईईएलएस) या रोबोची रचना सापासारखी करण्यात आली आहे.

एन्सेलेडसवरील बर्फमय भागातील वैशिष्ट्य जाणून घेणे हे या रोबोचे उद्दिष्ट आहे. आपल्या पृथ्वीवरील दुर्गम स्थाने, चंद्र आणि सौरमालेतील अन्य ग्रहांच्या नकाशे, मार्ग स्वयंचलितपणे बनविणे आणि त्यांचा शोध घेण्याच्या दृष्टिने ‘ईल्स’ची निर्मिती केली आहे, असे ‘जेपीएल’ने सांगितले.

या लॅबोरेटरीने २०१९मध्ये प्रथम याचे प्रारूप विकसित करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून ते त्यात सातत्याने सुधारणा करीत आहेत. २०२२ मध्ये ‘ईल्स’च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करीत दर महिन्याला त्याच्या चाचण्या करण्‍यासही ‘जेपीएल’ने सुरुवात केली.

सध्या ‘ईल्स १.०’ ही नवी आवृत्ती तयार केलेली असून त्याचे वजन १०० किलो असून लांबी चार मीटर आहे. वळणे, पकडणे, पुढे जाणे अशा हालचाली करण्यासाठी स्क्रूचा वापर करून दहा समान खंडात हा रोबो तयार केला आहे.

वालुकामय, बर्फाळ आणि बर्फाळ परिस्थितीत रोबोची चाचणी घेण्यात आली आहे. यात ‘जोपीएल’च्या ‘मार्स यार्ड’चाही वापर केला जात आहे. स्किईंग केल्या जाणाऱ्या भागात मंगळासारखा भूप्रदेश (मार्स यार्ड) तयार केलेला असून त्याला ‘रोबो मैदान’ असे म्हटले आहे.

पृथ्वी व सुदूर अवकाशातील ग्रह आणि तारे यांच्यातील संदेशवहनाचा कालावधी हा दीर्घ असल्याने रोबोचे स्वयंचलित कार्य हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. उदा. शनिपर्यंत रेडिओ लहरींद्वारे एका दिशेने संदेश पोहचण्यासाठी ८३ मिनिटे लागतात. पृथ्वी व अन्य ग्रह-तारांमधील संदेशवहनाला लागणाऱ्या वेळेमुळे ‘ईल्स’सा वातावरणाचा स्वयंचलित पद्धतीने माग काढीत आणि वैज्ञानिक साधनांसह माहिती गोळा करण्याची जोखीम घेत प्रवास करावा लागणार आहे. ‘ईल्स’मध्ये कोणती वैज्ञानिक साधने ठेवण्यात येणार आहेत, हे निश्‍चित झालेले नाही.

स्टिरीओ कॅमेरे व ‘लिडर’चा वापर

या प्रकल्पाचे प्रमुख रोहन ठक्कर पत्रकार परिषदेत म्हणाले, की जेथे रस्ते नाहीत, वाहतूक नियंत्रण यंत्रणा नाही, कोणतेही थांबे नाहीत, अशा परिस्थितीत एक स्वयंचलित मोटार जात आहे, अशी कल्पना करा. अशा वेळी रोबोला मार्ग निश्‍चित करून त्यानुसार मार्गक्रमण करावे लागणार आहे.

अशा स्थितीत परिसराचे त्रिमितीय नकाशे ‘ईल्स’ तयार करेल. यासाठी आठ स्टिरीओ कॅमेरे आणि लेझर प्रकाशाचा वापर करून भूप्रदेशाचे नकाशे बनविण्याच्या तंत्रज्ञानाचा (लिडर- लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) वापर हा रोबो करेल. रोबोसाठी सर्वांत सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी सेन्सरमधील दिशादर्शक माहितीचा उपयोग होईल. वेगवेगळ्या भूप्रदेशांमधील वातावरणात रोबो वापरण्यासाठी अभियंते संचाराचे पर्याय शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT