NASA Orion Spacecraft 
ग्लोबल

NASA Orion Spacecraft : ओरायनचा पृथ्वीकडील प्रवास सुरू

नासा ने प्रक्षेपित केलेल्या आर्टिमिस वन मोहिमेला १६ दिवस पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

फ्लोरिडा : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने प्रक्षेपित केलेल्या आर्टिमिस वन मोहिमेला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. चंद्राला प्रदक्षिणा घालून ओरायन यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

अंतराळयानाने शुक्रवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चांद्रकक्षेतील ‘रेट्रोग्रेड डिपार्चर बर्न’ यशस्वीपणे पूर्ण केले. यात यानाचे मुख्य इंजिन एक मिनिट ४५ सेकंदापर्यंत सुरू करण्यात आले. यामुळे ओरायन चंद्राच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीकडे येण्यास सुरुवात झाली.

इंजिनच्या कक्षा बदलामुळे ओरायनचा वेग बदलून प्रतिसेकंद ४५४ फूट असा झाला. हे इंजिन ‘ऑर्बिटल मॅन्युव्हरिंग सिस्टम’च्या श्रेणीतील आहे. ओरायन यानासाठी त्यात सुधारणा करण्यात आली आहे. अवकाश क्षेत्रातील साधनांची निर्मिती करणारी एरोजेट रॉकेटडीन या अमेरिकी कंपनीने ही प्रणाली तयार केलेली आहे.

मानवी चांद्रमोहिमेची चाचणी म्हणून अर्टिमिस वन मोहीम आखण्यात आली असून १६ नोव्हेंबर रोजी ओरायन अंतराळयान चंद्राकडे झेपावले होते. ११ डिसेंबरला ते प्रशांत महासागारात उतरणार आहे. त्यासाठी दोन वेळा कक्षा बदलण्यात येणार आहे. पहिला कक्षा बदल झाला असून दुसरा बदल सोमवारी (ता.५) होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT