NATO Determination of Ukraine No arms deal with Russia Sakal
ग्लोबल

युक्रेनचा निर्धार; रशियाबरोबर शस्त्रसंधी नाही!

रशियाकडून पूर्व भागात हल्ले सुरुच

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशियन सैनिक युक्रेनमध्ये असेपर्यंत शस्त्रसंधीची कोणतीही शक्यता नाही, असा निर्धार युक्रेन सरकारने आज व्यक्त केला. रशियाने पूर्वेकडील दोन्बास भागात हल्ले अधिक तीवे केले असल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने ही भूमिका स्पष्ट केली. रशियाने युक्रेनमधील इतर भागांवरील लक्ष कमी करून पूर्व भागावर तीव्र हल्ले सुरु केले आहेत. इतर अनेक भागांमध्ये युक्रेनी सैनिकांनी रशियाच्या सैनिकांना मागे लोटण्यात यश मिळविले आहे. यामुळे युक्रेनचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनमधून पूर्ण माघार घेईपर्यंत शस्त्रसंधी करणार नसल्याचे युक्रेनने जाहीर केले आहे.

दुसरीकडे, रशियाने दोन्बास भागात तीव्र हल्ले सुरुच ठेवले आहेत. ‘नाटो’कडे सदस्यत्वासाठी अर्ज करणाऱ्या फिनलंडचाही नैसर्गिक वायूचा पुरवठा त्यांनी थांबविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांनी आज युक्रेनच्या संसदेत भाषण करत त्यांना पाठिंबा दर्शविला. युद्ध सुरु झाल्यापासून युक्रेनच्या संसदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून भाषण करणारे ते पहिले विदेशी नेते ठरले आहेत.

फ्रान्सचा इशारा

युरोपीय महासंघात सहभागी होण्यास युक्रेनला किमान १५ किंवा २० वर्षे लागतील, असा इशारा फ्रान्सचे युरोपीय व्यवहार मंत्री क्लेमेंट बेयूने यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आपल्याला प्रामाणिक राहावे लागेल. युक्रेन युरोपीय महासंघात पुढील सहा महिन्यांत, वर्षभरात किंवा दोन वर्षांत दाखल होणार असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही खोटे बोलत आहात. त्यासाठी दीर्घ काळ लागतो.

युक्रेनी सैनिकांचे भवितव्य अंधारात

मारिउपोल शहरातील पोलाद प्रकल्पातील युक्रेनी सैनिकांना रशियाने युद्धबंदी बनविले असून त्यांचे भवितव्य अंधारात असल्याचा इशारा येथील माध्यमांनी दिला आहे. सुमारे अडीच हजार युक्रेनी सैनिकांना युद्धबंदी बनविले असल्याचे रशियाने जाहीर केले असून या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा रशियाचा विचार आहे. मारिउपोल शहर रशियाच्या ताब्यात गेल्याने या देशाला गेल्या तीन महिन्यांपासून हवा असलेला पहिला मोठा विजय मिळाला आहे.

यूट्युबकडून वाहिन्या बंद

युक्रेन युद्धाशी संबंधित ७० हजारांहून अधिक व्हिडिओ ‘यूट्युब’ आज त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले. तसेच, नऊ हजार वाहिन्याही बंद केल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचा भंग होत असल्याचे कारण देत कंपनीने ही कारवाई केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा ‘मुक्ती मोहिम’ असा उल्लेख केलेले व्हिडिओही काढून टाकण्यात आले आहेत. रशियामध्ये यूट्युब लोकप्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT