Vladimir Putin Esakal
ग्लोबल

Vladimir Putin: विषय संपला! व्लादिमीर पुतिन अणुबॉम्बचा वापर करणार? नेमकं असं काय घडलं?

Vladimir Putin Threatened Ukraine: पुतिन स्पष्ट म्हणालेत की, आम्हाला युक्रेनविरोधात युद्ध जिंकण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करण्याची आवश्यकता नाही, पण नाटो असं असा विचार करत असेल की मॉस्को असं कधी करणार नाही तर ही त्यांची चुकीची धारणा आहे.

कार्तिक पुजारी

मॉस्को- उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोने युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचे वक्तव्य केल्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भडकले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा अणुबॉम्बची धमकी दिली आहे. पुतिन स्पष्ट म्हणालेत की, आम्हाला युक्रेनविरोधात युद्ध जिंकण्यासाठी अणुबॉम्बचा वापर करण्याची आवश्यकता नाही, पण नाटो असं असा विचार करत असेल की मॉस्को असं कधी करणार नाही तर ही त्यांची चुकीची धारणा आहे.

युक्रेनला सैन्य मदत केली जात असेल तर नाटोशी रशियाचा संघर्ष होऊ शकतो. आणि युद्धाचे स्वरूप अणुबॉम्बच्या हल्ल्यात होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच मॉस्कोने आपला मित्र बेलारूससोबत मिळून अणु हल्ल्याचा सामरिक अभ्यास केला आहे. येत्या काही दिवसात नाटो युक्रेनमध्ये सैन्य तैनाती आणि रशियाच्या भूमित छोट्या हल्ल्यांना परवानगी देऊ शकते. याच पार्श्वभूमीवर रशियाने बेलारूससोबत युद्ध अभ्यास केला असल्याचं सांगितलं जातं.

पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. म्हणजे युद्ध सुरु होऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. युक्रेनला साथ देण्यासाठी अमेरिका आणि युरोपच्या अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे. येत्या काळात या देशांकडून युक्रेनला होणारी मदत वाढू शकते. अशा परिस्थितीत पुतिन हे अणुहल्ल्याची भाषा करत आहेत. तुम्ही कोणासोबत खेळत आहात याचा तुम्हाला अंदाज असायला हवा असं स्पष्ट वक्तव्य पुतिन यांनी केलं आहे.

सातत्याने तणाव निर्माण केला जात आहे. पण, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आम्ही सगळ्या पद्धतीच्या युद्धासाठी तयार आहोत. आम्ही काही पाऊल उचललं तर अमेरिका काय निर्णय घेणार? अमेरिकेला जागतिक संघर्ष हवा आहे का? असा सवाल पुतिन यांनी केला आहे. दरम्यान, नाटो ही अमेरिका आणि युरोपमधील काही देशांची मिळून स्थापन केलेली युद्ध संघटना आहे. याचा अर्थ नाटोमधील एकाही देशावर हल्ला झाला तर तो नाटोवरील हल्ला मानला जाईल. नाटोतील देश याला एकत्रितपणे उत्तर देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT