Nawaz Sharif in pakistan 
ग्लोबल

Nawaz Sharif: 'मी तुम्हाला कधी धोका दिला नाही'; पाकमध्ये परतलेल्या नवाझ शरिफांचे राजकीय कमबॅक!

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरिफांनी पाकिस्तानमध्ये वापसी केली आहे. गेले चार वर्षे ते स्वघोषित हद्दपारीमध्ये होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमीत पाय ठेवत त्यांनी राजकीय कमबॅक केला आहे. त्यांच्या आगमनावेळी हजारोंच्या संख्येने समर्थक लाहोरमध्ये जमा झाल्याचे पाहायला मिळालं. (Nawaz Sharif tells Lahore at comeback rally I have never betrayed you)

पाकिस्तानमध्ये सर्व पातळ्यांवर परिस्थिती गंभीर बनली आहे. आर्थिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यात पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवाझ शरिफ पाकिस्तानमध्ये परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचं दिसलं.

नवाज शरिफ यांचे प्रतिस्पर्धी इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. याचा फायदा घेण्यासाठी शरिफ परत आल्याचं बोललं जातं. त्यांच्या आगमनानंतर लाहोरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, मी तुम्हाला खूप दिवसांनी भेटत आहे. पण, माझं प्रेम थोडंही कमी झालेलं नाही. तुम्ही मला धोका दिला नाही आणि मी तुम्हाला धोका दिला नाही.

शरिफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझचे नेते आहेत. त्यांना कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पण, त्यांनी २०१८ मध्ये वैद्यकीय कारणास्तव ब्रिटनमध्ये पलायन केले होते. शरिफ यांना कोर्टाने अनेक नोटिसा पाठवल्या पण, त्यांनी दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. दाव्यानुसार, त्यांनी लष्करासोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ते परत पाकिस्तानात आलेत.

नवाझ शरिफ हे तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांना एकदाही कार्यकाळ पूर्ण करण्यात आलेला नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांना २०१७ मध्ये पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर इम्रान खान पंतप्रधान पदावर आले. पण, त्यांनाही तुरुंगात जावं लागलं आहे. त्यानंतर नवाज शरिफ यांचे बंधू शेहबाज हे सत्तेत आले आहेत. त्यांचे लष्करासोबत संबंध चांगले असल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT