ndia has lifted millions out of poverty, it is incredible: Donald Trump 
ग्लोबल

HowdyModi : मोदींचे भारतासाठी महान काम; ट्रम्प यांच्याकडून कौतुक

वृत्तसंस्था

ह्युस्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण करताना "सर्वांत जवळचे मित्र नरेंद्र मोदी' यांचे आभार मानले. मोदी हे भारतासाठी ते महान काम करत आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी येथे येऊ शकलो, हा माझा सन्मान आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हाऊडी मोदी कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले.

ट्रम्प यांनी मोदींच्या गेल्या महिन्यात होऊन गेलेल्या वाढदिवसाबद्दलही त्यांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या सर्व अडचणीत त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. अमेरिकेच्या विकासात अमेरिकी-भारतीयांचा मोठा हातभार असल्याचे सांगत ट्रम्प यांनी "तुमच्यासारखे नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे,' असे म्हटले.

कर कपात आणि उद्योगपूरक वातावरणामुळे अमेरिकेत कसे चांगले वातावरण आहे, असे सांगत ट्रम्प यांनीही अनायासे जमलेल्या हजारोंच्या समुदायासमोर आपला प्रचार करण्याची संधी साधली. तसेच, सीमा सुरक्षा ही दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे, असे सांगत काश्‍मीरप्रश्‍नी भारताच्या भूमिकेचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. मुंबईत पुढील आठवड्यात एनबीए बास्केटबॉलचे प्रदर्शनीय सामने आहेत. कदाचित यासाठी मी मुंबईत येईन, असेही ट्रम्प मिश्‍किलपणे म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

SCROLL FOR NEXT