Nirav Modi 
ग्लोबल

नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळला

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

जामीन मिळावा यासाठी मोदीने याअगोदर तीन वेळा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी मोदीने चौथ्यांदा अर्ज केला होता. आज (बुधवार) मोदीच्या याचिकेवर वेस्टमिन्स्टर कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी त्याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. नीरव मोदी याची जामिनावर सुटका केल्यानंतर तो शरण येईल असा कोणताही ठोस पुरावा नाही, असे कोर्टाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

लंडनला पळून गेल्यानंतर मार्च महिन्यात बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेल्या नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान शेतात कोसळले, शेतकरी महिलांनी पाहिला थरार..

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा प्रकरणात तक्रारी दिल्यास गुन्हे दाखल करू, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याचं आवाहन

IFS Success Story: अहिल्यानगरचा सुशांत वडावकर IFS परीक्षेत देशात ३१ वा; आयआयटीनंतर मिळवले मोठे यश, मेहनत, जिद्द आणि मार्गदर्शनाचे यश..

Stock Market Today: तब्बल 4 दिवसांनी शेअर बाजार हिरवा! कोणते शेअर्स तेजीत? आज 'या' दिग्गज कंपन्यांचा तिमाही निकाल

'त्याने मला सेटवर...' अमृता सुभाषने सांगितलं, 'रणवीर सिंह सेटवर कसा असायचा?' म्हणाली.....

SCROLL FOR NEXT