kp sharma oli government 
ग्लोबल

केपी ओलींना धक्का; नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुकांची घोषणा

सूरज यादव

दिवसभर झालेल्या राजकीय नाट्यानंतर केपी ओली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीने राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

काठमांडू - नेपाळमध्ये (Nepal) मोठी राजकीय उलथापालथ सुरु असून राष्ट्रपती विद्या देवी भंडारी (Vidya Devi bhandari) यांनी संसद बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. संसद बरखास्त केल्यानंतर मध्यावधी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. आता नेपाळमध्ये 12 ते 19 नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी शेर बहाद्दुर देऊबा आणि केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) या दोघांकडून करण्यात आलेला सत्ता स्थापनेचा दावा फेटाळून लावला.

संविधानातील तरतुदीनुसार कोणीही सत्ता स्थापन करू शकत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे केपी ओली पंतप्रधान असताना दुसऱ्यांदा अशी वेळ ओढावली आहे. दिवसभर झालेल्या राजकीय नाट्यानंतर केपी ओली आणि विरोधी पक्षांच्या आघाडीने राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र राजकीय पक्षांमधील अंतर्गत वादानंतर राष्ट्रपतींनी रात्री उशिरा दोन्ही पक्षांनी केलेला दावा फेटाळून लावला.

सरकार स्थापनेचा दावा फेटाळल्यानंतर मध्यरात्री केपी ओली यांनी मंत्रिमंडळाची अचानक बैठक बोलावली. त्यानंतर संसदेचं विसर्जन करण्याची शिफारस केली आणि मध्यावधी निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय करण्यात आला. विरोधी पक्षांनी 149 खासदारांच्या सहीचं पत्र शुक्रवारी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे सोपवलं होतं. पत्रात असं सांगण्यात आलं होतं की, काँग्रेस अध्यक्ष शेऱ बहादुर देऊबा यांना पंतप्रधान करण्याचा दावा करत आहे. यावर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं की, या प्रकरणी कायदा बघावा लागेल.

पंतप्रधान केपी ओली शर्मा हेसुद्धा बहुमताचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींकडे गेले होते. त्यांनाही कायद्यानुसार यावर निर्णय घ्यावा लागेल असं सांगण्यात आलं. विरोधी पक्षांकडून सांगण्यात आलं की, ओली यांनी खासदारांच्या सह्यांचे पत्र दिले नाही त्यामुळे त्यांच्या दाव्यात दम नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT