India China Faceoff.jpg 
ग्लोबल

भारत-चीन संघर्षावर नेपाळचे शांततेचे आवाहन   

सकाळ डिजिटल टीम

काठमांडू : पूर्व लडाख मध्ये भारत आणि चीन यांच्यात सीमावादावरून परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यानंतर आज नेपाळने भारत आणि चीनला दोन्ही देशातील सीमावादावरून असलेला मतभेद शांततेने सोडवण्याचे आवाहन केले आहे. भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून लडाख मधील सीमारेषेवरून मतभेद सुरु आहेत. अशातच सोमवारी रात्री भारत आणि चीन यांच्यातील लष्करात जोरदार संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नेपाळने दोन्ही देशांना आपापले मतभेद चर्चेने सोडवण्याचे आवाहन केले आहे.            

भारत आणि चीन यांच्यात मे महिन्यातील 5 तारखेपासून पूर्व लडाख मधील गलवान खोरे, पेंगोंग त्सो, डोमचाक आणि दौलत बेग ओल्डी या भागातील हक्कावरून वाद उफाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाख येथील वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु होती. मात्र सोमवारी 15 जून रोजी रात्री भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताच्या एका अधिकाऱ्यासह 20 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने देखील लडाख मधील आपली लष्करी कुमक वाढवत चीनला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती अजूनच युद्धजन्य झाली आहे.  त्यामुळेच या वादावर आता नेपाळने दोन्ही देशांना आपले मतभेद चर्चेने सोडवण्याचा आग्रह केला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात जाहीर केलेल्या निवेदनात, भारत आणि चीन हे दोन्ही देश प्रादेशिक व जागतिक शांतता आणि स्थिरता यासाठी परस्परातील मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही देशामध्ये असणाऱ्या सीमावादावर शांततेने तोडगा काढण्याचे आवाहन नेपाळने केले आहे.    

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सीमारेषेवरून मतभेद आहेत. पेंगोंग त्सो आणि गल्वान परिसरावर चीन पहिल्यापासून डोळा ठेवत आला असला तरी, मागील काही दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर चीनने घुसखोरी करत तंबू ठोकले आणि बंकर साठी लागणारे सामान आणले होते. चीनच्या या कृतीचा भारताकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. गल्वान परिसरातील रस्त्याच्या बांधकामाला चीनने आक्षेप घेतला होता. सीमारेषेवरील परिस्थिती बदलण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचे चीनकडून आरोप करण्यात आले होते. हे सर्व आरोप भारताने फेटाळून लावत, स्थानिक लोकांच्या सुविधेसाठी हा रस्ता भारताच्या आधीन असलेल्या भूभागावरच बांधला असल्याचे म्हटले होते. यानंतर सीमारेषेवरील वादग्रस्त भूभागावरून दोन्ही देशातील सैन्याच्या जवानांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार देखील पुढे आला होता. पण त्यानंतर सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच बिघडलेले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT