Ukraine Sakal
ग्लोबल

युक्रेनमध्ये प्रवासादरम्यान भारताचा झेंडा लावा; दुतावासाच्या सूचना

हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशिया युक्रेनमधील युद्धानंतर येथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये वैद्याकिय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास 18 हजारहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. (New Advisory Issue By Embassy of India in Ukraine For Indian Student )

या सर्वांना सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून (Indian Government) मोठ्या हालचाली करण्यात येत आहेत. या दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून युक्रेनमधील नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे.

मार्गदर्शन सूचनांमध्ये काय

  • यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जे विद्यार्थी सीमा भागाजवळ वास्तव्यास आहेत त्यांना एअरलिफ्टसाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

  • बाहेर पडताना कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहे.

  • सीमेकडे येताना पासपोर्ट, कॅशसह इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

  • प्रवासावेळी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावण्याबाबतची महत्त्वाची सूचनादेखील या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आली आहे.

  • कोरोनाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील बाळगण्याच्या सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT