new corona cases, italy 
ग्लोबल

इटली सावरतेय! दोन महिन्यानंतरची ही आकडेवारी जगाला दिलासा देईल अशीच

वृत्तसंस्था

रोम : जगभरातील जन-जीवन विस्कळीत करणाऱ्या कोरोनाजन्य संकटातून सावरुन युरोपातील काही देश परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. कोरोनाचा सामना करत असताना लॉकडाउनचे कठोर पालन केल्यानंतर इटलीने देशातील निर्बंध हळूहळू हटवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या इटलीत मागील दोन महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकड्यासह यातील मृतांचा आकडा नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळाल्याचे दिसते.   

इटलीतील स्थानिक वृत्तसंस्थेने आरोग्य मंत्रालयाच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात कोरोनाच्या भयावह परिस्थितीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात नव्या रुग्णांचा आकडा आवाक्यात ठेवण्यात इटलीमध्ये यश आले आहे. इटलीच्या आरोग्य मंत्र्यांनी रविवारी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मागील 24 तासांत इटलीत कोरोना विषाणूची लागण झालेले 675 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 145 लोकांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारी ही आकडेवारी 875 नवे रुग्ण आणि 153 जणांचा मृत्यू अशी होती. 4 मार्चनंतरची सर्वाधिक कमी रुग्ण आढळल्याची नोंद इटलीमध्ये झाली आहे. हे वृत्त इटलीसाठीच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाच्या दहशतीखाली जगणाऱ्या सर्वांसाठी दिलासा देणारे असेच आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी देशव्यापी  लॉकडाउन करण्याचा निर्णय घेणार इटली हा युरोपातील पहिला देश आहे. मृत्यूचं भयावह तांडव नृत्यानंतर इटलीने लॉकडाउनची कृती अंमलात आणली. त्याचे काटेकोर पालन करत आज इटली संकटजन्य परिस्थितीतून सावरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये टप्प्याटप्याने लॉकडाउनमधील निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून दुकाने, रेस्टोरंट, बार, ब्यूटी पार्लर,सलून, संग्रहालय आणि समुद्र किनारे खुले करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सकारात्मकतेच्या दिशेने पुन्हा जन-जीवन सुरळीत करत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा आवश्य त्याप्रमाणात वापर करण्याच्या सुचनाही सरकार आणि प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT