Corona Testing  Sakal
ग्लोबल

अल्फा, डेल्टानंतर नव्या व्हेरिएंटचं नाव ठरलं... WHO ची घोषणा!

ओमकार वाबळे

आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धुमाकूळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात लस अपयशी ठरतेय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शास्त्रज्ञांनी पुनरावलोकनानंतर नवीन स्ट्रेनला 'चिंताजनक प्रकार' म्हणून घोषित केलं आहे. आणि त्याला ग्रीक अक्षरात 'ओमिक्रॉन' असं नाव दिलंय. या प्रकारात मोठ्या प्रमाणात म्युटेशन होत आहे. त्यापैकी काही ओमिक्रॉनशी संबंधित असल्याचं डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटलं आहे.

प्राथमिक पुरावे इतर प्रकारांच्या तुलनेत या संसर्गाचा पुन्हा होण्याचा धोका होण्याची शक्यता आहे. तरीही, व्हेरियंटच्या संक्रमणक्षमतेबद्दल मुख्य प्रश्न शिल्लक आहेत, ते लोकांना आजारी पाडू शकते का आणि ते लस टाळण्यास सक्षम होऊ शकते का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्‍यांनी घोषणा केल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष्य याकडे लागलं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना देशाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं काटेकोरपणे टेस्टिंग करायला सांगितलं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह अन्य दोन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या व्हेरिएंटची ओळख पटवण्यात आली असून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग या देशांमधील नागरिकांसाठी धोका वाढल्याचं चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Latest Marathi News Live Update : माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

SCROLL FOR NEXT