corona corona
ग्लोबल

रशियन वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू

मानवात संसर्ग करण्याची ‘खोस्ता २’ची क्षमता ; लशीचे संरक्षणही निरुपयोगी ?

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : कोरोनाच्या दोन वर्षांच्या साथीनंतर जग पूर्वपदावर आले आहे. मात्र, एक चिंता वाढविणारी बातमी आहे. रशियातील वटवाघळांमध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू लशीचे सुरक्षाकवच भेदून मनुष्याला संसर्ग करू शकतो, असा संशोधकांचा दावा आहे. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या गटाने या विषाणुबाबत संशोधन केले. याचे निष्कर्ष ‘पीएलओएस पॅथोजन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. २०२० मध्ये ‘खोस्ता १’ व ‘खोस्ता २’ हे विषाणू २०२० मध्ये सापडले. त्यापैकी ‘खोस्ता २’ चा मनुष्याला संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे.

संशोधकांना ‘खोस्ता २’ हा विषाणू वटवाघळाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये आढळला. त्याचा मनुष्याला संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, कोरोनाची लस दिलेल्या व्यक्तींना तसेच कोरोनाच्या संसर्गानंतर प्रतिपिंडे (ॲंटीबॉडिज) विकसित झालेल्या व्यक्तींनाही खोस्ता २ विषाणुचा संसर्ग होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कोरोनाप्रमाणेच स्पाईक प्रोटिनचा वापर करून तो मानवी पेशीला संक्रमित करतो. ‘खोस्ता २’ आणि ‘कोव्ह २’ हे दोन्ही विषाणू कोरोना विषाणुच्या एकाच उपश्रेणीतील आहेत. ही उपश्रेणी ‘सारबेकोव्हायरस’ या नावाने ओळखली जाते.

अलीकडच्या काही वर्षांत ‘सारबेकोव्हायरस’ मधील शेकडो विषाणूंचा शोध लागला आहे. यात आशियातील वटवाघळांमधील विषाणूंचा समावेश आहे. मात्र, यातील बहुसंख्य विषाणूंचा मानवी पेशींना संसर्ग होत नाही. यातील ‘खोस्ता १’ चा मनुष्याला कमी धोका असला तरी ‘खोस्ता२’मध्ये मनुष्याला संसर्ग करण्याची क्षमता असल्याचे आढळले. संशोधकांनी कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांना अभ्यास केला.

संशोधक मायकेल लेटको म्हणाले, की अनुवांशिकदृष्ट्या हे रशियन विषाणू जगात इतरत्र आढळणाऱ्या विषाणुसारखे दिसत होते. मात्र, ते सार्स कोविड २ सारखे दिसत नसल्याने त्यांच्या फारसा अभ्यास करण्याची गरज वाटली नाही. मात्र, सखोल संशोधन केले असता मनुष्याला संसर्ग करण्याची त्यांची क्षमता पाहून आश्चर्य वाटले. या गटातील विषाणू आशियाबाहेरील वन्यजीवांत अस्तित्वात असल्याचे आढळले. पश्चिम रशियातही ‘खोस्तो २’ विषाणू आढळला असून त्याचा जागतिक आरोग्याला तसेच कोरोनाच्या अद्याप सुरू असलेल्या लसीकरणालाही धोका आहे.

प्रमुख निष्कर्ष

  • ‘खोस्ता२’वर कोरोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम होत नाही.

  • ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमधील प्रतिपिंडेही प्रभावहीन

  • मनुष्यामध्ये संसर्ग होत असताना ‘खोस्ता २’ मधील काही जनुके वगळली जातात

केवळ कोरोनाच्या ज्ञात प्रकारांविरुद्ध लस तयार करण्याऐवजी त्याच्या सर्वच प्रकारांपासून संरक्षण देणाऱ्या लशीची निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या सार्स-कोव्ह२ च्या पुढील प्रकारापासून तसेच एकूणच सारबेकोव्हायरस उपश्रेणीतील विषाणुपासून संरक्षण देणारी लस बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

- मायकेल लेटको, संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT