Cattle 
ग्लोबल

मांसासाठी हे पशू पाळा; चीनमध्ये पशुधनाची नवी यादी जाहीर

वृत्तसंस्था

हाँगकाँग - मांसाचे उत्पादन करण्याच्या उद्देशाने पशुधन म्हणून कुठल्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात पालन करावे याची नवी यादी चीन सरकारच्या कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या विषाणूचा उगम चीनमधील वुहान शहरात असलेल्या मांस बाजारामधून झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव झाल्यानंतर चीन सरकारने अन्नासाठीच्या सर्व प्रकारच्या प्राण्याच्या व्यापारावर बंदी घातली होती. या संदर्भात नवा कायदा करण्याचा चीन सरकारचा विचार असला तरी तो अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. 

चीनच्या कृषी मंत्रालयाने बुधवारी पशुधनाची नवी यादी प्रसिद्ध केली असून, त्यात वराह, गाई, कोंबड्या आणि मेंढ्या आदींचा समावेश आहे. त्याच बरोबर या यादीत हरीण, लामा नावाचा मेंढीच्या जातीचा प्राणी आणि शहामृगाचा समावेश आहे. 

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अद्यापही वेगाने वाढत असल्याने चीनने मांस बाजार इतक्यात सुरु करू नये, असे आवाहन युरोपीय देशांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : मनोज जरांगे यांनी घेतली अभिजीत दीपकेंची भेट

Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

SCROLL FOR NEXT