New Prime Minister Ranil Wickremesinghe voted for Gotabaya Rajapaksa
New Prime Minister Ranil Wickremesinghe voted for Gotabaya Rajapaksa sakal
ग्लोबल

श्रीलंकेतील पेच : अविश्‍वास ठराव फेटाळला; गोटाबयांची खुर्ची वाचली

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : देशभरात अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्याविरोधात संतापाची लाट असताना आज संसदेत मात्र त्यांच्याविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्‍वासाचा ठराव नामंजूर झाला. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने ६८ मते तर विरोधात ११९ मते पडली. विशेष म्हणजे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी गोटाबया यांच्या बाजूने मतदान केले. अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. तमीळ नॅशनल अलायन्स (टीएनए) खासदार एम.ए. सुमनथिरन यांनी अविश्‍वासाचा ठराव आणला.

अविश्‍वास ठरावाच्या विरोधात ११९ खासदारांनी मते दिली तर ठरावाच्या बाजूने ६८ मते पडली. त्यामुळे ७२ वर्षीय अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांचा संसदेत सहज विजय झाला. संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष समागी जन बलावेगयाचे खासदार लक्ष्मण किरीइला यांनी अविश्‍वास ठरावाला पाठबळ दिले होते.

समागी जन बलावेगयाचे खासदार हर्ष डिसिल्वा म्हणाले, की प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांत नव्याने नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे देखील सामील होते. मानवी हक्क वकील भवानी फोन्सेका यांनी ट्विट केले असून त्यांनी म्हटले की,अध्यक्षांची पाठराखण करणारे खासदार यानिमित्ताने उघडे पडले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात उसळलेल्या हिंसाचारात सत्ताधारी पक्षातील ७८ नेत्यांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.

राष्ट्रीय एअरलाइन्सची विक्री करणार

श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक अडचणींचा मुकाबला करण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय एअरलाइन्सची विक्री करण्याचा निर्णय श्रीलंका सरकारने घेतला आहे. तसेच अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी नव्या सरकारला नवीन नोटा छापण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले, की श्रीलंकेच्या राष्ट्रीय एअरलाइन्सचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आपण मांडत आहोत. ही सेवा अनेक दिवसांपासून तोट्यात आहे. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेच्या विमान कंपनीला ४५ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. विमानसेवेचे खासगीकरण झाले तरी हे नुकसान आपल्यालाच सहन करावे लागणार आहे, असे विक्रमसिंघे यांनी नमूद केले. परंतु ज्याने आतापर्यंत विमानही पाहिले नाही, त्यांना याचा फटका बसू नये, अशी अपेक्षा आहे.

अजिथ राजपक्ष संसदेचे नवे उपसभापती

श्रीलंकेचे सत्ताधारी पक्षाने संसदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक जिंकली आहे. खासदार अजिथ राजपक्ष यांची आज उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. महिंदा राजपक्ष यांच्या राजीनाम्यानंतर प्रथमच संसद बोलाविण्यात आली होती. श्रीलंका पोडुजना पेरामुना पक्षाचे ४८ वर्षीय राजपक्ष यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. त्यांना १०९ मते मिळाली तर विरोधी पक्षाच्या समागी बलावेगयाच्या उमेदवार रोहिणी कविरत्न यांना ७८ मते मिळाली. राजपक्ष यांचा सत्ताधारी राजपक्ष कुटुंबाशी संबंध नाही, परंतु दोघांचा जिल्हा एकच आहे. सभापती महिंदा यापा अभेवर्धना यांनी २३ मते बाद ठरल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT