google sakal
ग्लोबल

Technology Company : युरोपमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांसाठी नवे नियम; शुक्रवारपासून अंमलबजावणी

इंटरनेटचा वापर करताना नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी युरोपीय महासंघाने नवी नियमावली केली तयार.

पीटीआय

लंडन - इंटरनेटचा वापर करताना नागरिकांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी युरोपीय महासंघाने नवी नियमावली तयार केली आहे. युरोपमध्ये सेवा पुरविणाऱ्या ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘टिकटॉक’ आणि इतर सर्वच बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना हे नवे नियम पाळावे लागणार आहेत. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची सुरक्षा आणि बेकायदा व्यवहारांना आळा या उद्देशाने हे नियम बनविण्यात आले आहेत.

युरोपीय महासंघाने तयार केलेल्या नव्या ‘डिजिटल सेवा कायद्या’चा पहिला टप्पा या आठवड्यापासून लागू होणार आहे. तंत्रज्ञान कंपन्यांची मनमानी रोखण्याचाही हेतू हा कायदा तयार करण्यामागे आहे, असे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारपासून तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व कंपन्यांना या कायद्याचे पालन करावे लागणार आहे.

इंटरनेट वापरकर्त्यांची सुरक्षा जपणे, सोशल मीडियाद्वारे होणारा द्वेषमूलक किंवा हिंसेच्या प्रचाराला आळा घालणे, हा या कायद्यामागील हेतू आहे. युरोपीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचाही उद्देश आहे.

कायद्याचे पालन न केल्यास कंपन्यांना अब्जावधी डॉलरचा दंड होणार असल्याने काही कंपन्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यास सुरुवातही केली आहे. या कायद्याच्या कार्यक्षेत्रात काही निवडक कंपन्याच असल्या तरी नंतर आणखी काही कंपन्यांवर नजर ठेवली जाणार आहे.

नव्या कायद्यानुसार, इंटरनेटचा वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा वापर करून आणि त्यांनी ‘सर्च’ केलेल्या माहितीचा आधार घेत त्यांच्यावर जाहिरातींचा मारा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, काही बेकायदा वस्तूंचीही जाहिरात केली जाते, त्या प्रकारांना आळा घालावा लागणार आहे. १७ वर्षांपर्यंतच्या वापरकर्त्यांच्या कोणत्याच माहितीचा वापर करून त्यांना जाहिराती पाठविता येणार नाहीत.

या कंपन्यांवर नजर

  • सोशल मीडिया : फेसबुक, टिकटॉक, एक्स, युट्यूब, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, पिंटरेस्ट, स्नॅपचॅट

  • ई कॉमर्स : ॲमेझॉन, बुकिंग डॉट कॉम, अलिबाबा अली एक्स्प्रेस (चीन), झलांदो (जर्मनी)

  • ॲप स्टोअर : गुगल प्ले आणि ॲपलचे ॲप स्टोअर

  • सर्च इंजिन : गुगल सर्च, बिंग

अंमलबजावणी न केल्यास...

  • जागतिक पातळीवर गोळा होणाऱ्या महसूलाच्या सहा टक्के इतका दंड

  • युरोपमध्ये व्यवसाय करण्यास बंदी

  • यंत्रणेत तातडीने बदल करावा लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT