Spectacular fireworks light up the Sky Tower in Auckland as New Zealand becomes one of the first countries to welcome New Year 2026 with grand celebrations.

 

esakal

ग्लोबल

New Year 2026 Celebration Video : न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये जबरदस्त आतषबाजीने नवीन वर्षाच्या जल्लोषाला सुरुवात

Auckland New Year 2026 Celebration : जगभरात काही ठिकाणी नवीन वर्षाचे आगमन झाले असून जल्लोषही सुरू झाला आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे.

Mayur Ratnaparkhe

New Zealand Auckland New Year Fireworks : भारतात नवीन वर्ष २०२६च्या आगमनास काही तास शिल्लक असताना, जगभरात काही ठिकाणी नवीन वर्षाचे आगमन झाले असून जल्लोषही सुरू झाला आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. वेगवेगळ्या टाइम झोनमुळे, अनेक देश वेगवेगळ्या वेळी नवीन वर्ष साजरे करतात. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे भारताच्या आधी नवीन वर्ष साजरे केले जाते.

जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात केले जाणार आहे. भारतात ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यानंतर नवीन वर्ष सुरु होईल मात्र त्या आधीच २९ देशांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार किरिबाटीमध्ये दुपारी ३:३० वाजता नवीन वर्ष सुरू होईल. त्यानंतर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अनेक आशियाई देशात नवे वर्ष उजाडेल. युरोप आणि अमेरिकेत भारतानंतर ९ तासांनी उशिरा नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल.

नवीन वर्षाच्या निमित्ताने जगभरातील अनेक शहरांमध्ये भव्य आतषबाजीचे प्रदर्शन केले जाते. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये, सिडनी हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसवर भव्य आतषबाजीचे प्रदर्शन केले जाते, जे लाखो लोक थेट पाहतात.

याशिवाय, अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्येही शानदार आतषबाजी पाहायला मिळते. ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथील कोपाकाबाना बीच आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील लेक बर्ली ग्रिफिन येथेही नवीन वर्षाच्या दिवशी विशेष शो आयोजित केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

SCROLL FOR NEXT