ग्लोबल

न्यूयॉर्क टाइम्स, CNN आणि इतरही आंतरराष्ट्रीय वेबसाईट्स पडल्या बंद

विनायक होगाडे

नवी दिल्ली : न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन, द गार्डीयन या आणि इतर काही आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट्स सध्या डाऊन झालेल्या आहेत. प्राथमिक माहितीमधून समजतंय की CDN म्हणजेच Content Delivery Network मधील काही तांत्रिक कारणांमुळे ही अडचण निर्माण होऊन या साइट्स बंद पडल्या आहेत. या वेबसाइट्स प्रामुख्याने अमेरिकेतील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या वेबसाईटवर 'आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत, काही वेळाने प्रयत्न करा' असा संदेश येतो आहे तर इतर साईट्स फक्त तांत्रिक अडचण इतकाच संदेश येतोय. याबाबतची अधिक माहिती येणे बाकी आहे.

अनेक वेबसाईट्स ज्यामध्ये अधिकतर न्यूज वेबसाईट्सचा समावेश आहे, अशा साईट्स आज बंद पडल्याचं चित्र पहायला मिळालं. यामध्ये बीबीसी, द न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन आणि द गार्डीयन सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यूज साईट्सचा समावेश आहे. या साईट्स उघडल्या असता युझर्सना 'एरर' असा मॅसेज पहायला मिळाला. या न्यूज वेबसाईट्स सहितच इतरही अनेक साईट्स जसे की, पिंटरेस्ट, रेडइट, ट्विच, स्पॉटिफाय या देखील बंद पडल्या होत्या.

युझर्सनी याबाबत मोठ्या संख्येने तक्रार नोंदवली. यामागचं कारण CDN (Content Distribution Network) प्रोव्हाईडर असू शकतं, असं म्हटलं जातंय.
यातल्या काही साईट्स हळूहळू ओपन होऊ लागल्या आहेत. मात्र काही साईट्स अजूनही बंदच आहेत. Content Distribution Network किंवा CDN हे एक प्रॉक्सी सर्व्हरचे एक नेटवर्क आहे. आणि त्यांचे डेटा सेंटर्स हे विस्तृत क्षेत्रामध्ये वितरीत केले जातात. या कंपन्या कार्यक्षमता आणि वेब सर्व्हीसेसची उपलब्धता सुधारण्यासाठी ग्लोबल सर्व्हरचे नेटवर्क चालवतात.

फास्टली देखील याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, या समस्येला दूर करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या आउटेजमध्ये अद्यापतरी कसल्याही सायबर अटॅकची माहिती समोर आली नाहीये. या घटनेनंतर ट्विटरवर #InternetShutdown ट्रेंड करत आहे.

'या' वेबसाईट्स पडल्या बंद

  • ब्रिटीश सरकारची जीओव्ही डॉट युके, गार्डीयन, फायनॅन्शियल एक्सप्रेस, इंडिपेंडंट, न्यू यॉर्क टाइम्स, रेडिट, ऍमेझॉन, सीएनन, फॅनडम, हुलूलू, ट्विचअप, द वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल, ट्विटर, पे पल, स्पॉटीफाय, ई बे, गीट हब, पीनस्ट्रेस्ट, स्वेअरस्पेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT