ग्लोबल

न्यूझीलंडच्या खासदार बाळंतपणासाठी सायकलवरून रुग्णालयात,फोटो Viral

ओमकार वाबळे

तुम्ही अनेकदा महिलांची विमानात, ट्रेनमध्ये किंवा प्रवासात डिलीव्हरी झाल्याचं ऐकलं असेल. पण न्यूझीलंडच्या एक खासदार प्रसुतीच्या कळा सोसत थेट सायकल चालवत रुग्णालयात पोहोचल्या.

त्यामुळे न्यूझीलंडच्या ग्रीनमधील या खासदाराने नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय. बाळाच्या जन्मासाठी या खासदार महिलेने सायकलस्वारी केली. खासदार ज्युली अ‍ॅन जेंटर यांनी यापूर्वी आपल्या पहिल्या मुलाच्या, जन्मावेळी असंच केलं होतं. यासंदर्भात त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जेंटरने रविवारी पहाटे 3 वाजता तिला वेदना होऊ लागल्यानंतर सायकलवर हॉस्पिटल गाठलं.

बाळाच्या जन्मासाठी या खासदार महिलेने सायकलस्वारी केली. (सौजन्य - ज्युली अॅन्ने जेंटर)

जेंटरने एका सुंदर संदेशासह बातमी शेअर केली. "मोठी बातमी! आज पहाटे ३.०४ वाजता आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याचे स्वागत केलं. मी खरंच प्रसूतीच्या काळात सायकल चालवण्याची योजना आखत नव्हतो, परंतु ते घडलंच. जेव्हा आम्ही मध्यरात्री 2 वाजता हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो, तेव्हा माझी परिस्थिती नॉर्मल होती. काही प्रमाणात वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र सर्व नियंत्रणात असल्याने आणि रुग्णालयही घरापासून जास्त लांब नसल्याने सायकरवर जाण्याचा निर्णय घेतला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता आमच्या कुशीत एक निरोगी, आनंदी लहान मुलगी झोपली आहे. ती तिच्या वडिलांप्रमाणे दिसते, असं जेंटरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT