Jacinda Ardern Resigns esakal
ग्लोबल

Jacinda Ardern : 'हीच योग्य वेळ' म्हणत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा; जॅसिंडा म्हणाल्या, मला पराभवाची..

न्यूझीलंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jacinda Ardern Resigns : न्यूझीलंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (New Zealand PM Jacinda Ardern) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

7 फेब्रुवारीला संपणार कार्यकाळ

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपत आहे. मात्र, त्याआधीच त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून सर्वांनाच चकित केलं. गुरुवारी पक्षाच्या वार्षिक कॉकस बैठकीत आर्डर्न म्हणाल्या, 'काम पूर्ण करण्यासाठी माझ्याकडं पुरेशी ऊर्जा शिल्लक नाहीये. राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे.'

न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर, जॅसिंडा आर्डर्न यांनी यापुढं निवडणूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं. मात्र, मला पराभवाची भीती वाटत असल्यामुळं मी राजीनामा देत नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जॅसिंडा आर्डर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याबरोबरच त्यांच्या पक्षाच्या विजयाची घोषणाही केलीये. आगामी निवडणुकीत मजूर पक्ष नक्कीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याबरोबरच पुढची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे, तोपर्यंत त्या खासदार म्हणून काम करत राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT